बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि हटके भूमिकांसाठी विकीला खास ओळखले जाते. विकी कौशलने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री कतरिना कैफसोबत लगीनगाठ बांधली. ते दोघेही त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. विकी कौशल सध्या चर्चेत आहे, त्याचा ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात विकी कौशल बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींनबरोबर दिसत आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याने चित्रपटाबद्दल आणि कतरीनाची प्रतिक्रिया याबद्दल त्याने सांगितले आहे. तो असं म्हणाला “मला तिच्याबरोबर बोलायला वेळ नव्हता. मी जेव्हा इथे येण्यासाठी निघालो तेव्हा तिला दाखवण्यासाठी माझ्याकडे ट्रेलर नव्हता. बहुतेक तिने चित्रपटाचा ट्रेलर पहिला असावा. मी हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. तीदेखील मला कायम सांगत असते तुझ्यातील मजेशीर स्वभाव असाच कायम सुरु ठेव. मी एक असा माणूस आहे जो कायमच मज्जा मस्ती करत असतो. चित्रपट पाहण्यासाठी ती खूप उत्सुक आहे.”

“चित्रपट फ्लॉप झाला तर…” सलमानसाठी कथा न लिहिण्यामागचं वडील सलीम खान यांनी सांगितलं कारण

विकी कतरीना सध्या चर्चेत असतात. कतरीनाने करावा चौथ हा सणदेखील साजरा केला होता. त्यांचा जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत असते. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाहसोहळा ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये शाही थाटात पार पडला. ते दोघेही ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. हा संपूर्ण सोहळा ७ ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या लग्नात कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते.

कतरीना नुकतीच ‘भूत पोलीस’ चित्रपटात दिसली होती. विकी कौशलने आजवर गंभीर भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटामध्ये विकी कौशल गोविंदा वाघमारे ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे. भूमी पेडणेकरने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे तर कियारा अडवाणी त्याची प्रेयसी दाखवली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट सस्पेन्स कॉमेडी असणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda naam mera actor vicky kaushal revealed that katrina kaif always push me to explore my fun side spg