बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. गोविंदा बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. एकेकाळी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या गोविंदाकडे आता चित्रपट नाहीत. गोविंदाला चित्रपट मिळत नसले तरी तो आलिशान आयुष्य जगतो. गोविंदा स्क्रीनवर दिसत नसला तरी तो वर्षाकाठी कोट्यवधी रुपये कमावतो. चित्रपटांपासून दूर असूनही गोविंदा राजा बाबूसारखं ऐशोआरामाचं आयुष्य कसं जगतोय ते जाणून घेऊयात.

गोविंदाच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास तो पाच वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर दिसला होता. २०१९ साली आलेल्या ‘रंगीला बाबू’ चित्रपटात गोविंदाने काम केलं होतं. हा चित्रपट फ्लॉप झाला होता, यानंतर तो कोणत्याही चित्रपटात दिसला नाही.

वरातीत ३ गाड्या अन् ५ पाहुणे! ५१ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे अमिताभ बच्चन व जया बच्चन, त्यांच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?

गोविंदाची एकूण संपत्ती

गोविंदाची एकूण संपत्ती १५१ कोटींहून जास्त आहे. गोविंदाचे अनेक बंगले आहेत. प्रत्येक बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. गोविंदा रिॲलिटी शोमध्ये दिसतो, परंतु त्याची मुख्य कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि रिअल इस्टेटमधून येते. गोविंदाकडे मर्सिडीज बेंझसारख्या महागड्या कारही आहेत. गोविंदा दरवर्षी १६ कोटींहून अधिक कमावतो. त्यापैकी गोविंदा ब्रँड एंडोर्समेंटमधून जवळपास दोन कोटी रुपये कमावतो.

Video: “तू फक्त मातीच खा”, प्रितम शिखरेंचा नुपूरला टोला; माय-लेकाचा व्हिडीओ पाहून मराठी अभिनेत्रींना हसू आवरेना

बंगल्यांमधून होते गोविंदाची कमाई

गोविंदा राहतो त्या बंगल्याचे नाव ‘जल दर्शन’ आहे. गोविंदा आपल्या पत्नी व मुलांसह इथे राहतो. गोविंदाचा अमेरिकेतही बंगला आहे. त्या बंगल्याचं तो महिन्याकाठी लाखो रुपये भाडं घेतो. गोविंदाचा मुंबईतील मढ आयलंडमध्ये एक बंगला देखील आहे जो तो चित्रपटांच्या शूटिंगसाठी भाड्याने देतो, गोविंदा येथूनही भरपूर कमाई करतो.

शाहरुख खान मध्यरात्री कर्मचाऱ्याच्या झोपडपट्टीतील घरी जायचा, प्रसिद्ध कॉमेडियनचा दावा; म्हणाला, “मी तिथे भाड्याने…”

गोविंदाचा पश्चिम बंगालमधील कोलकाता इथंही बंगला आहे, तिथून तो आपली कमाईही करतो. गोविंदाचे दोन फार्महाऊस देखील आहेत, एक फार्महाऊस लखनऊमध्ये आहे, जे खूप मोठे आहे. गोविंदा अनेकदा आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी याठिकाणी जातो. इथं त्याची शेतीही आहे, त्यातूनही त्याला उत्पन्न मिळतं.

अ‍ॅक्शन नाही अन् रोमान्सही नाही, १५ कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ सिनेमाने कमावले १०२ कोटी, कुठे पाहता येणार? वाचा

गोविंदाने १९८० च्या दशकात ॲक्शन आणि डान्सिंग हिरो म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, मात्र ९० च्या दशकात तो विनोदी अभिनेता म्हणून घराघरात प्रसिद्ध झाला आणि त्याला खूप प्रेम मिळाले. त्याने आपल्या चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं.

Live Updates