Govinda Reacts on Divorce Rumors : ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा आणि विनोदांनी लोकांना खळखळून हसवणारा अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलंय, तो व त्याची पत्नी सुनीता आहुजा ३७ वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांवर अखेर गोविंदाने मौन सोडले आहे.
गोविंदा व सुनीता विभक्त होणार असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून येत आहेत. गोविंदाची ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण असल्याची चर्चा आहे. अशातच गोविंदाला यासंदर्भात विचारण्यात आलं, त्याने काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
गोविंदा काय म्हणाला?
गोविंदाने याबद्दल प्रतिक्रिया दिली असली तरी फार तपशील दिलेले नाहीत. इ-टाइम्सने गोविंदाला त्याच्या वैवाहिक आयुष्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चांबाबात विचारलं. “सध्या फक्त बिझनेसबद्दल चर्चा सुरू आहेत. मी माझे चित्रपट तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे,” असं गोविंदा म्हणाला. तर घटस्फोटाच्या चर्चांबद्दल त्यांनी सुनीताला मेसेज केला, पण तिने रिप्लाय दिलेला नाही.
काही महिन्यांपूर्वी गोविंदा जखमी झाला होता, त्याच्या पायाला गोळी लागली होती. तेव्हा गोविंदा त्यांच्या बंगल्यावर एकटाच होता. पत्नी व मुलं तिथे नव्हते. “आमची दोन घरं आहेत, आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक बंगला आहे. फ्लॅटमध्ये माझे मंदिर आणि माझी मुलं आहेत. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आणि त्याला लोकांना भेटण्यात उशीर होतो. त्याला बोलायला आवडतं, त्यामुळे तो १० लोकांना गोळा करून त्यांच्याशी गप्पा मारत बसेल. मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी फ्लॅटमध्ये एकत्र राहतो, पण आम्ही फार कमी बोलतो कारण मला वाटतं की तुम्ही जास्त बोलून तुमची ऊर्जा वाया घालवता,” असं सुनीता म्हणाली होती. त्यावरून ते एकत्र राहत नाहीत हे स्पष्ट झालं. याचदरम्यान आता या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या चर्चेचा विषय ठरला आहे.