९० च्या दशकात बॉलीवूड गाजवणारा अभिनेता गोविंदा(Govinda) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्तेत आला होता. सुनिता आहुजा व गोविंदा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, सहा महिन्यांपूर्वी सुनिता आहुजाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, सध्या त्यांच्यात सर्व काही सुरळित असल्याचे गोविंदाच्या वकिलाने स्पष्ट केले आहे. आता मात्र, अभिनेता गोविंदा वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अभिनेत्याने नुकतीच मुकेश खन्ना यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने विविध विषयांवर गप्पा मारल्या. तसेच त्याने जेम्स कॅमेरून यांनी त्याला १८ कोटी रूपयांची ऑफर दिली होती. तसेच अवतार या चित्रपटात त्याला प्रमुख भूमिकेची ऑफर दिली होती, असाही खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोविंदाने मुकेश खन्ना यांच्या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मी अमेरिकेत एका सरदारजींना भेटलो होतो. मी त्यांना व्यवसाय करण्याची एक कल्पना दिली. ती कल्पना यशस्वी ठरली. काही वर्षांनंतर त्यांनी मला जेम्स कॅमेरूनला भेटायला लावले. त्यांनी मला जेम्स कॅमेरूनबरोबर चित्रपटात काम करण्याचे सुचवले. म्हणून मी जेम्स कॅमेरून यांना चर्चा करण्यासाठी जेवणासाठी आमंत्रित केले. त्यावेळी मी त्यांना चित्रपटाचे अवतार हे शीर्षक सुचवले. जेम्सने कॅमेरून यांनी मला सांगितले की चित्रपटातील नायक अपंग आहे. त्यामुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यांनी मला त्यासाठी १८ कोटी रुपयांची दिली आणि मला ४१० दिवसांसाठी शूटिंग करावे लागेल, असे सांगितले. मी म्हणालो की ते ठीक आहे, पण जर मी माझे शरीर रंगवले तर मी रुग्णालयात असेन.”

पुढे गोविंदाने म्हटले, “आपले शरीर व्यक्त होण्याचे सगळ्यात महत्वाचे एकमेव साधन असते. अनेकदा काही गोष्टी व्यावसायिकदृष्ट्या खूप आकर्षक दिसतात. परंतु त्याचे तुमच्या शरीरावर होणारे परिणाम देखील पाहावे लागतात. बऱ्याचदा चित्रपटाला नकार दिल्याबद्दल तुम्हाला वर्षानुवर्षे लोकांची माफी मागत राहावे लागते. हे जवळचे लोक असले तरी त्यांच्यात खूप अहंकार असतो”, असे म्हणत एखाद्या चित्रपटाला नकार दिला तर लोकांची माफी मागत राहावे लागत असल्याचे म्हटले आहे.

गोविंदाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये अभिनेत्याने खुलासा केला होता की या वर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आता अभिनेता कोणत्या चित्रपटात आणि कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.