हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता गोविंदा व त्याचा भाचा कॉमेडियन व अभिनेता कृष्णा अभिषेक यांच्यात मागच्या काही वर्षांपासून मतभेद आहेत. दोघेही अनेकदा मुलाखतीत एकमेकांवर टीका करताना दिसतात. मात्र, गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धन यांनी नुकतीच कृष्णाची बहीण आरती सिंहच्या लग्नाला हजेरी लावली होती. तेव्हापासून या मामा- भाच्यातील मतभेद दूर झाले, वाद संपले असं म्हटलं जात आहे. जवळपास मागच्या आठ वर्षांपासून त्यांच्यात वाद होते. पण गोविंदा आपल्या भाच्यावर नाराज का होता, याचा खुलासा त्यानेच एका मुलाखतीत केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोविंदाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तो कृष्णाशी नाराज का आहे. मनीष पॉलशी बोलताना गोविंदा या विषयावर मनमोकळेपणाने बोलला होता. आता आरती सिंहच्या लग्नातील गोविंदाचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही व्हिडीओ क्लिप पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गोविंदा कृष्णाच्या जुळ्या मुलांना भेटायला गेल्याचं सांगतोय. कृष्णा जुळ्या मुलांचा बाबा झाल्यावर मी त्यांना भेटायला गेलो होतो, पण तरीही तो मुलाखतीत वारंवार म्हणतोय की मामा मुलांना भेटायला आले नव्हते, असं गोविंदा म्हणाला.

अक्षय कुमारच्या ‘या’ चित्रपटात होत्या तब्बल १५ अभिनेत्री, ३० कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने कमावले होते…

“जेव्हा कृष्णाच्या मुलांचा जन्म झाला होता, तेव्हा मी पत्नी सुनितासोबत मुलांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, आम्ही मुलांना पाहिली पण आम्हाला त्यांच्या जवळ जाण्यास मनाई करण्यात होती. मी सुनीताला म्हटलं की कदाचित मुलांना संसर्ग होऊ नये या भीतीने ते मनाई करत आहेत. मी त्याच्या मुलांना भेटायला गेलो होतो, तरी कृष्णाने अनेकदा म्हटलं की मामा माझ्या मुलांना भेटायला आले नाही. मी त्याला खूपदा सांगितलंय की मी मुलांना भेटायला आलो होतो, पण कृष्णा ते मान्य करायला तयार नाही,” असं गोविंदा म्हणाले होते.

‘हीरामंडी’ व ‘शैतान’नंतर या आठवड्यात OTT वर येणार ‘हे’ जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वाचा यादी

कृष्णाने मामाला म्हटलं होतं शत्रू

गोविंदा यांनी दुसऱ्या एका व्हिडीओत म्हटलं होतं की एका शोमध्ये कृष्णा म्हणत होता की मला शत्रूची गरज काय आहे? माझ्या घरातच माझा मामा माझा शत्रू आहे. गोविंदाच्या मते हे कृष्णा स्वतः बोलला होता, त्याला हे कोणत्याही लेखकाने लिहून दिलं नव्हतं. आपल्याबद्दल कृष्णाने त्याची मतं बनवली आहेत, असं गोविंदाचं म्हणणं होतं.

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

कश्मीरा शाहचं ‘ते’ विधान अन् आता माफी

दरम्यान, काही वर्षांपूर्वी कृष्णाने मामा गोविंदाला त्याच्या शोमध्ये बोलावलं होतं, पण गोविंदा त्याच्या शोमध्ये जाण्याऐवजी कपिल शर्माच्या शोमध्ये गेला होता. यानंतर कृष्णाची पत्नी कश्मीरा शाहने एक ट्वीट केलं होतं. ‘काही लोक पैशांसाठी नाचतात’ असं तिने त्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, त्यानंतर गोविंदा व त्यांची पत्नी सुनिता यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून गोविंदा व कृष्णाचे कुटुंबीय बोलत नव्हते, पण आरतीचं लग्न ठरल्यावर गोविंदा लग्नाला आल्यास त्यांच्या पाया पडून माफी मागेन असं कश्मीरा म्हणाली होती. म्हटल्याप्रमाणे तिने गोविंदाचे आशीर्वाद घेतले आणि तिच्या जुळ्या मुलांची गोविंदाशी ओळख करून दिली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda reveals why he is angry on krushna abhishek arti singh wedding hrc