Govinda Sunita Ahuja : गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. पण आता ते विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या दोघांचाही संसार मोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. मतभेदामुळे ते वेगळे होणार आहेत, अशी चर्चा आहे.
सुनीता आहुजाने गेल्या काही दिवसांत अनेक मुलाखती दिल्या. मात्र, यापैकी एकाही मुलाखतीत गोविंदा तिच्याबरोबर नव्हता. गोविंदा व सुनीता यांच्या नात्यात दुरावा आला असून ते विभक्त होऊ शकतात, असे वृत्त बॉलीवूड शादीने दिले आहेत. लग्नाच्या ३७ वर्षानंतर ते लवकरच घटस्फोट घेण्याची शक्यता आहे. सततच्या मतभेदांमुळे हा निर्णय ते घेत असल्याचं म्हटलं जात आहे.
याच दरम्यान, झूम टीव्हीने गोविंदाबद्दल एक धक्कादायक अपडेट दिली आहे. गोविंदाची ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीशी असलेली कथित जवळीक हे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, गोविंदा किंवा सुनीता आहुजा या दोघांनीही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
गोविंदा व सुनीता वेगळे राहतात
गोविंदाबरोबर राहत नसल्याचं काही दिवसांपूर्वी सुनीताने एका मुलाखतीत सांगितलं. “आमची दोन घरं आहेत, आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक बंगला आहे. फ्लॅटमध्ये माझे मंदिर आणि माझी मुलं आहेत. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो आणि त्याला लोकांना भेटण्यात उशीर होतो. त्याला बोलायला आवडतं, त्यामुळे तो १० लोकांना गोळा करून त्यांच्याशी गप्पा मारत बसेल. मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी फ्लॅटमध्ये एकत्र राहतो, पण आम्ही फार कमी बोलतो कारण मला वाटतं की तुम्ही जास्त बोलून तुमची ऊर्जा वाया घालवता,” असं सुनीता म्हणाली होती.

गोविंदा व सुनीताची लव्ह स्टोरी
गोविंदाच्या एका नातेवाईकाचं लग्न सुनीताच्या मोठ्या बहिणीशी झालंय. त्या लग्नात या दोघांची पहिली भेट झाली होती. सुनीता श्रीमंत घरात वाढली होती, तर गोविंदा विरारमधील एका गावात मोठा झाला. सुनीता १५ वर्षांची होती तेव्हा गोविंदाच्या प्रेमात पडली. त्यानंतर तीन वर्षांनी तिने गोविंदाशी लग्न केलं. लग्नात सुनीता १८ वर्षांची तर गोविंदा २४ वर्षांचा होता.
लग्न झाल्याची बातमी गोविंदाने करिअरच्या फायद्यासाठी लपवली होती. यशाच्या शिखरावर असल्याने लग्नाची बातमी समोर आल्यास लोकप्रियतेला फटका बसू शकतो, अशी भीती त्याला होती. गोविंदा व सुनीता यांना १९८८ मध्ये मुलगी झाली, तिचं नाव टीना आहे. तर त्यानंतर ९ वर्षांनी त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव यशवर्धन आहे.
गोविंदाने लग्नाची बातमी नंतर उघड केली होती, पण त्याचं नाव खूप अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. नीलम कोठारी, राणी मुखर्जी यांच्याबरोबर त्याचं अफेअर होतं, असं म्हटलं जातं. लग्न केल्याची माहिती लपवल्याचा पश्चाताप झाला, अस गोविंदा नंतर म्हणाला होता.