आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचा दिवस आहे. राज्यभरात या विधानसभा निवडणुकांची मोठी चर्चा होत होती. सर्वच पक्षांनी मोठा प्रचार प्रसार केल्याचे दिसले. महाराष्ट्रात आता सत्ता कोणाच्या हाती जाणार, याची उत्सुकता सर्वांना लागल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक नागरिकाचे मत हे मौल्यवान आहे, त्यामुळे १०० टक्के मतदान व्हावे, प्रत्येक नागरिकाने मतदान करावे यासाठीदेखील निवडणूक आयोगाकडून जागरुकता निर्माण करण्याचे काम केले. आता २३ नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्राची सत्ता कोणत्या पक्षाच्या हातात जाणार हे २३ तारखेला समजणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या कलाकारांनी केले मतदान?

आता बॉलीवूड सेलिब्रिटींनीदेखील त्यांचा मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर पाहायला मिळत आहे. बॉलीवूडचे आण्णा म्हणजेच सुनील शेट्टी यांनी मुंबई येथे मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोज दिली. याबरोबरच लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांची पत्नी सुनिता अहुजा यांनीदेखील मतदान केले असल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी म्हटले की, मला वाटते सगळ्या लोकांनी बाहेर आले पाहिजे आणि मतदान केले पाहिजे. जे कोणी सत्तेत येतील त्यांनी चांगले काम केले पाहिजे आणि नागरिकांची सेवा केली पाहिजे.” गोविंदा मतदान करण्यासाठी येणार का? असे विचारल्यानंतर, “त्यांना यावेच लागेल, प्रचार करत होते मग येणार नाहीत का?” असे त्यांनी म्हटले. सुनिता अहुजा यांनी मुंबईत मतदान केले. गोविंदा शिवसेनेचे नेते आहेत.

अभिनेता जॉन अब्राहमनेदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करून परत जात असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अभिनेता अली फजलनेदेखील मतदान केले असून मतदान केल्यानंतर त्याने फोटोसाठी पोज दिल्याचे पाहायला मिळाले. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनेदेखील मतदान केले आहे. मतदान करून जात असताना एका जेष्ठ व्यक्तीबरोबर झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

हेमा मालिनी आणि ईशा देओल ही मायलेकीची जोडी मतदान करण्यासाठी पोहोचलेली दिसली. याबरोबरच जेष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यासाठी ते मतदान केंद्रावर पोहोचलेले दिसले. यावेळी ते काठी टेकत आले असल्याचे पाहायला मिळाले. मतदान केल्यानंतर त्यांनी फोटोसाठी पोजदेखील दिली. अभिनेत्री निकिता दत्तानेदेखील मतदान केल्याचे पाहायला मिळत आहे. रविना टंडन आणि मुलगी राशा यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. गोविंदाने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर फोटोसाठी पोज दिली. अभिनेत्री रकुल प्रीत सिंघ आणि जॅकी भगनानी यांनी कुटुंबासह मतदान केले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: शिल्पा शिरोडकरला धाकट्या बहिणीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, आहे दाक्षिणात्य सुपरस्टारची पत्नी

दरम्यान, बॉलीवूडच्या इतर अनेक कलाकारांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमधून पाहायला मिळत आहे. फरहान अख्तर, सोनू सूद, सोहेल खान अशा कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. या कलाकारांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda to hema malini bollywood celebrities cast votes maharashtra assembly election vidhansabha nsp