बॉलीवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर नेहमीच चर्चेत असतो. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. आता रणबीर त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यग्र आहे. अलीकडेच ‘रामायण’च्या सेटवरील त्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणबीर कपूरने त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक असे हिट चित्रपट दिले आहेत. परंतु २०१७ साली प्रदर्शित झालेला ‘जग्गा जासूस’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात गोविंदालादेखील कास्ट केलं होतं परंतु, काही कारणातस्व गोविंदाला या चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याची चर्चा होती.

हेही वाचा… सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला घातली होती लग्नाची मागणी, संजय लीला भन्साळींशी आहे तिचं खास कनेक्शन

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनुराग बसू यांनी गोविंदाच्या भूमिकेबद्दल माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, “जग्गा जासूसची शूटींग सतत पुढे ढकलत चालली होती. गोविंदा शूटिंगसाठी येणार आहे की नाही यावरूनच खूप गोंधळ सुरू होता.”

खरं तर त्यावेळेस साउथ अफ्रिकामध्ये शूटिंग सुरू होती. सगळं योजनेनुसार सुरू होतं पण खूप गोंधळ झाल्यामुळे गोविंदाला बाजूला करण्यात आलं. या गोष्टीमुळे गोविंदा खूप नाराज झाला होता.

हेही वाचा… VIDEO: ट्रोलर्ससाठी ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

खरं तर, रणबीर कपूरने या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे. रणबीरने कबूल केलं होतं की चूक त्याचीही होती, कारण- त्याने अपूर्ण स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली होती. नंतर रणबीरने गोविंदाची माफीदेखील मागितली होती.

हेही वाचा… ठरलं तर मग: सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य? पाहा प्रोमो

दरम्यान, रणबीर कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ ऋषी वाल्मीकी यांच्या महाकाव्यावर आधारित आहे. रणबीर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत; तर देवी सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. केजीएफ स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याचीदेखील चर्चा आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govinda was removed from ranbir kapoor jagga jasoos film dvr