बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते. अनेकदा तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ती तिच्या फॅशनमुळेही बरेचदा ट्रोल होताना दिसते. सध्या तर ती तिच्या नव्या कथित बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आहे. ती जिम ट्रेनरला डेट करत असल्याच्या चर्चा सातत्याने होताना दिसत आहेत. पण आता सोशल मीडियावर दिशा पाटनीसंबंधी असा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या आजीला होणारी बायको म्हणून चक्क दिशा पाटनीचा फोटो दाखवला आणि मग आजीने त्यावर जी प्रतिक्रिया दिली ती भन्नाट होती. या तरुणाने आपल्या आजीला दिशाचा बॉडीसूटमधील फोटो दाखवला होता. त्यावर आजी नातवाला कडक शब्दात तंबी देताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर नेटकरीही मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने, “अशी सून घरी आणली तर आजी घरातून बाहेर काढेल.” असं कॅप्शन दिलं आहे.

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
The young man holding paati wrote funny message
“सुंदर बायको भेटायला नशीब नाही, तर..” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO होतोय व्हायरल
Sarpanch husband caught cheating on his wife with girlfriend wife beats girlfriend video viral mp
आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
Krish Jagarlamudi married to Hyderabad doctor
Video: प्रसिद्ध दिग्दर्शकाने ४६ व्या वर्षी गुपचूप उरकलं दुसरं लग्न; डॉक्टरशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ आला समोर

आणखी वाचा- “मुलाच्या लव्ह लाइफमध्ये मी…” टायगर- दिशाच्या ब्रेकअपवर जॅकी श्रॉफ यांची पहिली प्रतिक्रिया

जेव्हा तो तरुण आपल्या आजीला दिशा पाटनीचा फोटो दाखवून सांगतो की ती त्याची होणारी बायको आहे. त्यावर आजी त्याला स्पष्ट शब्दात नकार देते. त्यानंतर तो आपल्या आजीला पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण ती तिचे कपडे पाहून अजिबात नाही असं सांगते आणि आईला विचार असं म्हणते. त्यावर तो आईला आवडली आहे. तिने होकार दिला आहे असं सांगतो तेव्हा आजीला जास्त राग येतो आणि ती चिडून अशी मुलगी नातसून म्हणून अजिबात नको असं सांगताना दिसते. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट कमेंट करत आजीचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- दिशा पाटनीकडे युजरनं मागितला बिकिनी फोटो, तिने अशी केली त्याची बोलती बंद!

दरम्यान मागच्या काही दिवसांपासून जिम ट्रेनर अलेक्झँडरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. काही वर्षांपासून दिशा पाटनी अभिनेता टायगर श्रॉफला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांनी कधीच माध्यमांसमोर त्याची कबुली दिली नव्हती. आता टायगरशी ब्रेकअप झाल्यानंतर दिशा एका जिम ट्रेनरला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.