Guddi Maruti on Divya Bharti Death : बॉलीवूड अभिनेत्री गुड्डी मारुतीने दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीबरोबर काम करतानाच्या तिच्या आठवणी सांगितल्या आहेत. तिने दिव्याला एक छान पण थोडी गोंधळलेली मुलगी म्हटलंय. दिव्या प्रचंड उत्साही होती, तसेच दिव्याला उंचीची भीती वाटायची नाही, तिला तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या कठड्यावर बसलेलं पाहिलं होतं असं तिने सांगितलं. दिव्याच्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबियांना व पती साजिद नाडियादवालाला मोठा धक्का बसला होता. तसेच दिव्याचा खून झाला होता, असं म्हटलं गेलं होतं; तिच्या पतीवर आरोपही झाले होते, मात्र त्या सगळ्या गोष्टी खोट्या असल्याचं गुड्डी म्हणाली.

१९९३ मध्ये पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटमधून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता, त्यावेळी ती अवघ्या १९ वर्षांची होती. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत गुड्डी म्हणाली, “ती एक छान पण थोडी गोंधळलेली मुलगी होती. मला तिच्या बालपणाबद्दल माहीत नाही, पण ती थोडी अस्वस्थ असायची. प्रत्येक दिवस ती शेवटचा दिवस असल्याप्रमाणे आयुष्य जगायची. ती खूप स्वच्छंदी, छान मुलगी होती. ती साजिद नाडियादवाला बरोबर होती, तेव्हा आम्ही ‘शोला और शबनम’चे शूटिंग करत होतो. ४ एप्रिलला माझा वाढदिवस असतो आणि ५ एप्रिलच्या रात्री तिचा मृत्यू झाला. माझ्या वाढदिवसाला आम्ही सगळे एकत्र पार्टी करत होतो. गोविंदा, दिव्या, साजिद आणि इतर काही जण होते. ती पार्टीत ठीक होती, पण मला वाटलं की ती थोडी उदास आहे. तिला आऊटडोअर शूटसाठी जावं लागणार होतं, पण तिला जायचं नव्हतं.”

हेही वाचा – घटस्फोटित अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या आध्यात्मिक गुरूशी केलं दुसरं लग्न, फोटो झाले व्हायरल

गुड्डी मारुतीने सांगितला ‘तो’ प्रसंग

६ एप्रिलला सकाळी विमानात असताना गुड्डीला दिव्याच्या मृत्यूची बातमी समजली होती. तसेच दिव्याचं वागणं काही वेळा विचित्र वाटायचं, असं म्हणत तिने एक प्रसंग सांगितला. “ती जुहू येथील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहायची. एके रात्री मी त्या इमारतीजवळच्या आईस्क्रीमच्या दुकानात जात होते. त्यावेळी मला कोणतरी नावाने हाक मारत होतं. मी वर पाहिलं तर ती दिव्या होती. ती पाचव्या मजल्यावरील एका कठड्यावर पाय लटकवून बसली होती. मी तिला म्हटलं की ते सुरक्षित नाही आणि तिने आत जावं. पण ती मला म्हणाली काहीही होत नाही. तिला उंचीची भीती वाटत नव्हती. मी मात्र तिच्याकडे बघूनच घाबरले होते,” असं गुड्डी म्हणाली.

actress guddi maruti on divya bharti death
अभिनेत्री गुड्डी मारुती (फोटो – इन्स्टाग्राम)

हेही वाचा – दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…

तोंड रक्ताने माखलेली एक मांजर शिरली अन्…

दिव्याच्या निधनानंतर तिच्या कुटुंबाला भेटल्यावरचा एक भयंकर क्षण गुड्डीने सांगितला. “पाहुणे येऊन दिव्याच्या आईचे सांत्वन करत होते तेव्हा तोंड रक्ताने माखलेली एक भटकी मांजर तिथे शिरली आणि ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. ते सगळं खूप दुःखद होतं”, असं गुड्डी म्हणाली.

हेही वाचा – फिल्मी करिअर ठरलं फ्लॉप, दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध क्रिकेटपटूशी केलं लग्न; या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

दिव्याला खाली पडताना कोणी पाहिलं?

गुड्डी दिव्याच्या आईबद्दल म्हणाली, “तिच्या आईची अवस्था खूप वाईट होती. साजिद तर पूर्णपणे हरवला होता. तो खूप वाईट अवस्थेत होता. घटना घडली तेव्हा तो घरी नव्हता. साजिदची कार आली आहे का, हे पाहण्यासाठी दिव्या खिडकीतून खाली वाकली आणि खाली पडली होती.” ही घटना घडली तेव्हा डिझायनर नीता लुल्ला तिथे होती. “नीता लुल्ला तिथे होती. त्या दोघी बोलत असतानाच दिव्या साजिदची गाडी आली की नाही ते पाहण्यासाठी गेली होती. त्यानंतर नीताने तिला खाली पडताना पाहिलं होतं,” असं गुड्डी म्हणाली.