गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत आतापर्यंत १३२ हून जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण घटना घडली. १०० वर्ष जुना झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतून १७७ जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. या दुःखद घटनेनंतर बॉलिवूडकरांनी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मच्छू नदीवरील पूल कोसळताच तत्काळ लष्कर, हवाई दलासह नौदलही घटनास्थळी दाखल झाले. जवळपास २०० जवानांकडून हे बचाव कार्य सुरु करण्यात आलं. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी याबाबत माहिती दिली. अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत याबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

“गुजरातच्या मोरबीमधील मच्छू नदीवरील पूल कोसळल्यानं घडलेली दुर्घटना पाहून खूप दुःख झालं. या घटनेमध्ये ज्यांनी आपल्या जवळची माणसं गमावली त्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. तसेच या दुर्घटनेमध्ये जे जखमी झाले आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी मी प्रार्थना करतो.” असं अनुपम खेर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

आणखी वाचा – Morbi Bridge Collapsed CCTV: तरुणांची हुल्लडबाजी भोवली? पूल कोसळतानाचं सीसीटीव्ही फूटेज आलं समोर, पाहा व्हिडीओ

तसेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत म्हटलं की, “मोरबी पूल दुर्घटनेबाबत ऐकताच खूप दुःख झालं. सगळ्या पीडित कुटुंबीयांसाठी मी प्रार्थना करतो. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई झाली पाहिजे. शहरी नक्षलवाद्यांचा यामध्ये हात आहे का? याचाही तपास करा. कारण हे लोक कोणत्याही थराला जाण्याची शक्यता असते.” असं स्पष्ट शब्दांमध्ये विवेक यांनी आपलं मत व्यक्त केलं.