बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. यावरुन त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे. २०२२ वर्ष अक्षयसाठी फारसं चांगलं नव्हतं. या वर्षामध्ये त्याचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘कटपुतली’ आणि ‘राम सेतू’ असे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातच ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटात तो दिसणार नसल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

अक्षय कुमार आपल्या चित्रपटांप्रमाणे सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. नुकताच त्याने गुजरातमधील केवाडिया येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ समोर तो बसलेला आहे असा फोटो आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. ‘मी एकता नगरमध्ये आहे, जिथे जगातील सर्वात उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आहे. निसर्गाच्या कुशीत इथे खूप काही करण्यासारखे आहे,’ अशा शब्दात त्याने कॅप्शन दिला आहे. फोटोमध्ये तो एका पुलाच्या कठड्यावर बसून पुतळ्याकडे बघत आहे.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
Supriya Sule Sunil Tingre
Supriya Sule : “…तर तुम्हाला कोर्टात खेचेन, सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस”, सुप्रिया सुळेंचा दावा
What Ajit Pawar Said About Nawab Malik?
Ajit Pawar : “नवाब मलिकांना ३५ वर्षे ओळखतो ते दाऊदची साथ…”; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Photos : ‘हेरा फेरी ३’ ते ‘लव्ह आज कल’; कार्तिक आर्यनने ‘या’ सुपरस्टार्सना रिप्लेस करत बाजी मारली

नुकताच त्याचा एक व्हिडीओ चर्चेत आला होता ज्यात त्याने आपल्या आगामी कामांबद्दलचे संकेत दिले आहेत. अभिनेता अक्षय कुमारचे यावर्षी तब्बल ५ चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी ४ थेट चित्रपटगृहात आणि एक ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला. यापैकी एकही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही.

अक्षय कुमार गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. संघर्ष करत त्याने आज बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. सुरवातीला त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरत होते मात्र २००० चं दशक सुरु झालं आणि त्याने एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिले. आपल्या चित्रपटांमधून त्याने कायमच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.