बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते गुलशन ग्रोवर यांनी ८०च्या दशकात अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात ते कधी मुख्य भूमिकेत तर कधी मित्र किंवा भावाच्या भूमिकेत दिसले होतं. पण जेव्हा त्यांनी खलनायकाची भूमिका साकारण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र सर्वजण त्यांना पाहतच राहिले. त्यावेळी बॉलिवूडमध्ये प्रेम चोप्रा, पंकज धीर, मुकेश ऋषी, आशुतोष राणा आणि रजा मुराद यांसारखे कलाकार चित्रपटांमध्ये खलनायक साकारत होते. पण तरीही गुलशन यांनी त्यांच्या कारकिर्दीत बरंच नाव कमावलं. पण अलिकडेच मनिष पॉलच्या पॉडकास्टमध्ये त्यांना त्यांच्या करिअरबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
गुलशन ग्रोवर यांनी सांगितलं की एका निर्मात्याने त्यांना त्याच्या चित्रपटाच मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. पण ही भूमिका त्यांना एका अटीवरच ऑफर करण्यात आली होती. गुलशन ग्रोवर हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत कोणत्याही खलनायकी भूमिकेत दिसणार नाहीत अशी अट त्यावेळी त्यांना घालण्यात आली होती.
आणखी वाचा- विवाहित सलीम खान यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या हेलन, सलमानच्या आईला पाहून लपवायच्या चेहरा अन्…
गुलशन ग्रोवर म्हणाले, “ही माझ्या प्रतिस्पर्ध्यांची मला थांबवण्यासाठीची चाल होती. हे सगळं करण्यासाठी त्यांनी त्या निर्मात्यााला बरीच मोठी रक्कम दिली होती. त्यावेळी या इंडस्ट्रीमध्ये माझे एक-दोन प्रतिस्पर्धी नव्हते. अनेकजण माझ्या विरोधात होता आणि माझं करिअर उध्वस्त करण्यासाठी त्यांनी निर्मात्याला पैसे दिले होते. पण त्या चित्रपटाआधी मी बरेच असे चित्रपट नाकाराले होते ज्यासाठी मला मुख्य भूमिकांच्या ऑफर आल्या होत्या.”
आणखी वाचा- बॉडीगार्डने चाहत्याला दिला धक्का, पण अक्षय कुमारच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
“मी बराच विचार करून नायकाच्या भूमिका नाकारल्या होत्या. मला नायक म्हणून कधीच नकार मिळाला नव्हता. पण मी स्वतःच अशा भूमिका करू इच्छित नव्हतो. एक चित्रपट होता ज्यात कमल हासन आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण कमल हासन यांच्याआधी या भूमिकेसाठी मला विचारणा झाली होती.” असंही गुलशन ग्रोवर म्हणाले.
गुलशन ग्रोवर यांच्या कामाबद्दल बोलायचं तर ते लवकरच ‘इंडियन २’मध्ये दिसणार आहेत. तर २०२२ मध्ये त्यांनी ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ आणि ‘द गुड महाराजा’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.