ऑस्करमधील बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म पुरस्कारासाठी पात्र १५ चित्रपटांची यादी जाहीर झाली आहे. मात्र, भारताकडून ऑस्करसाठी पाठवलेल्या ‘लापता लेडीज’ (Lost Ladies) या चित्रपटाचा त्यात समावेश नसल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने (FFI) भारताकडून अधिकृत एन्ट्री म्हणून ऑस्करसाठी पाठवला होत. ‘ परंतु, अनेकांनी असा दावा केला की पायल कपाडियाचा ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ हा चित्रपट अधिक चांगला पर्याय होता.
‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाल्याने प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडियावर’ टीका केली आहे. चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) आणि यांनीही यावर आपली नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा…भारताला मोठा धक्का, ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर; गुनीत मोंगाची ‘अनुजा’ झाली शॉर्टलिस्ट
हंसल मेहता यांची प्रतिक्रिया
हंसल मेहताने ‘X’ या प्लॅटफॉर्मवर ऑस्करच्या ९७ व्या पुरस्कार सोहळ्यातील बेस्ट इंटरनॅशनल फीचर श्रेणीतील शॉर्टलिस्ट शेअर केली. त्यांनी उपरोधिकपणे लिहिले, “फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया पुन्हा एकदा करून दाखवलं! त्यांचा चित्रपट निवडीचा रेट वर्षानुवर्षे खरोखरच ‘परफेक्ट’ आहे!”
यावर अनेक युजर्सनी हंसल यांच्या मताला समर्थन दिले. एकाने लिहिले, “इंडियन फिल्म्स लापता!” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत शेखर कपूरच्या ‘बँडिट क्वीन’ आणि रितेश बत्राच्या ‘लंचबॉक्स’ या चित्रपटांचा उल्लेख करत FFI ने या चित्रपटांचीही ऑस्करसाठी केली नसल्याची आठवण करून दिली.
Film Federation of India does it again! Their strike rate and selection of films year after year is impeccable. pic.twitter.com/hiwmatzDbW
— Hansal Mehta (@mehtahansal) December 17, 2024
शॉर्टलिस्टमध्ये इतर चित्रपटांचा समावेश
या १५ चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये फ्रान्स, ब्राझील, कॅनडा आणि यूकेसारख्या देशांचे चित्रपट आहेत. ब्रिटीश-भारतीय दिग्दर्शक संध्या सुरी यांच्या ‘संतोष’ (Santosh) या चित्रपटाचा यात समावेश असून तो यूकेचे प्रतिनिधित्व करतो.
हेही वाचा…बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”
भारतातील निवड प्रक्रियेबाबत प्रश्न
‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने सप्टेंबरमध्ये २९ चित्रपटांमधून ‘लापता लेडीज’ची निवड केली होती. यामध्ये रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’, मल्याळम नॅशनल अवॉर्ड विजेता ‘आट्टम’ आणि कान्स विजेता ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटांचा समावेश होता. पण, ‘लापता लेडीज’ची निवड झाल्यापासूनच वादंग सुरू झाले होते. आता हा चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये न आल्याने ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.