बॉलीवूडमधील बहुआयामी अभिनेता म्हणून मनोज बाजपेयींना ओळखले जाते. आत्तापर्यंत त्यांनी विविध चित्रपटांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोज बायपेयी यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी नुकतेच एका मुलाखतीत मनोज बाजपेयी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता हंसल मेहता चित्रपटांबरोबर त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ‘सिटीलाइट्स’, ‘शाहिद’, ‘अलिगढ’, ‘दस कहानी’ आणि ‘दिल पे मत ले यार’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. 2000 मध्ये आलेल्या ‘दिल पे मत ले यार’ या चित्रपटात त्यांनी मनोज बाजपेयींबरोबर काम केले होते. या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान मनोज बाजपेयींचा आलेला अनुभव हंसल मेहतांनी शेअर केला आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…

हेही वाचा- “…अन् माझा डावा हात दुखू लागला”, श्रेयस तळपदेने सांगितला हार्ट अटॅक आला त्या दिवसाचा घटनाक्रम; म्हणाला, “माझा चेहरा…”

हंसल मेहता म्हणाले, “मला त्या लोकांबरोबर काम करायला मला मजा येते जे माझ्याबरोबर चांगले वागतात. राजकुमार राव त्यापैकीच एक. ‘मनोज बाबत बोलायचे झाले तर त्याचा मूड खूप बदलत राहतो. मी २००० साली त्याच्याबरोबर ‘दिल पे मत ले यार’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर काम करताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मनोजचे वागणे थोडे वेगळे होते. सेटवर लोक त्याच्यापासून दूर पळायचे.”

हंसल मेहता पुढे म्हणाले, “मनोज हा वाईट माणूस नाही, पण तो मूडी आहे. जेव्हा आम्ही चित्रपटात एकत्र काम करत होतो, तेव्हा माझी खूप चिडचिड व्हायची. मात्र, मी त्याला विचारायचो की तू असा का वागतोस? तो काहीच बोलायचा नाही तिथून निघून जायचा.”

हेही वाचा- शूरा खानशी दुसरं लग्न केल्यावर अरबाज खानने मलायकाला केले अनफॉलो? तर अभिनेत्रीने…

मनोज बायपेयींच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच त्यांचा ‘किलर सूप’ हा कॉमेडी क्राईम वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजमध्ये त्यांच्याबरोबर कोंकणा सेन शर्माची मुख्य भूमिका आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन आणि सहलेखन अभिषेक चौबे यांनी केले आहे. ही वेबसिरीज ११ जानेवारी २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. तसेच ते ‘द फॅमिली मॅन’च्या तिसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे.

Story img Loader