Hansika Motwani New Home : लोकप्रिय दाक्षिणात्य व बॉलीवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी हिने नवीन घर घेतलं आहे. तिने गृहप्रवेशाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये तिच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. हंसिकाने पती सोहेल खातुरियाबरोबर नवीन घरात पूजा केल्याचं फोटोमध्ये दिसतंय.

हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी खूप लोकप्रिय आहे. तिने फक्त बॉलीवूडच नाही तर अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं आहे. सध्या हंसिका तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. हंसिकाने एक नवीन आलिशान घर घेतलं आहे. तिने ‘नवीन सुरुवात’ म्हणत तिच्या या घराचे काही फोटो व पूजेचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले.

mrinal kulkarni mother dr veena dev passed away
“शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे…”, आईच्या निधनानंतर मृणाल कुलकर्णींची भावुक पोस्ट; साहित्य विश्वावर शोककळा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Surbhi Jyoti Sumit Suri got married
‘कबूल है’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, देवभूमीतील नॅशनल पार्कमध्ये केलं लग्न, फोटो आले समोर
What Raj Thackeray Said About Sharad Pawar
Raj Thackeray : “आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची बोचरी टीका
prithvik pratap and prajakta dated each other for 11 years
तब्बल ११ वर्षांचं प्रेम, प्राजक्ताची साथ ते लग्न! पृथ्वीक प्रतापने लग्नाबद्दल स्वत:च केला खुलासा; म्हणाला, “२०१३ पासून…”
neha gadre marathi actress announces pregnancy
इंडस्ट्री सोडून विदेशात झाली स्थायिक; ‘ही’ मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! बाळाच्या जन्माआधी केलं जेंडर रिव्हिल
bigg boss marathi dhananjay powar share netizen post
“निक्की-अरबाजचे फालतू चाळे तासभर TV वर दाखवून…”, Bigg Boss फेम धनंजय पोवारने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
Narendra modi BHIM UPI Babasaheb Ambedkar
“BHIM UPI चं नाव बाबासाहेबांच्या नावावर”, मोदींचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेने खोडून काढला? पुरावा देत म्हणाले…

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीने खरेदी केलं नवीन घर! शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो, होतोय कौतुकाचा वर्षाव

हंसिकाने शेअर केले सुंदर फोटो

हंसिका तिचा पती सोहेल खातुरियाबरोबर तिच्या नवीन घरात पूजा करताना दिसत आहे. पहिल्या फोटोत हवन दिसत आहे. दुसऱ्यामध्ये हंसिका आणि सोहेल घरामध्ये पाय ठेवताना दिसत आहेत. तिसऱ्या फोटोत हंसिका तिच्या आलिशान घरात प्रवेश करताना दिसते. यानंतर, तिने घरातील स्वतःचे आणि तिच्या पतीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हंसिका व सोहेल दोघेही खूप छान दिसत आहेत.

हंसिका मोटवानीचा लूक

हंसिका मोटवानीच्या लूकबद्दल बोलायचं झाल्यास तिने या खास प्रसंगी हिरव्या रंगाची साडी नेसली होती, त्याचबरोबर गुलाबी रंगाचा ब्लाउज घातला आहे. सोन्याचे दागिने घालून तिने तिचा हा लूक पूर्ण केला. सााध्या मेकअपमध्येही हंसिका खूपच सुंदर दिसत आहे. तिचा पती सोहेलने कुर्ता घातला आहे.

hansika motwani new home photos
हंसिका मोटवानी व सोहेल खातुरिया (फोटो – इन्स्टाग्राम)

Video : आजी अन् नातवाचं प्रेम! ‘बर्थडे गर्ल’ म्हणत शिवने ‘असा’ साजरा केला लाडक्या आजीचा वाढदिवस, सर्वत्र होतंय कौतुक

हंसिका व सोहेलचं लग्न

हंसिका व सोहेल यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. सोहेल हा मुंबईतील एक उद्योजक आहे. हंसिका आणि सोहेल खातुरिया अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते, ते चांगले मित्र व बिझनेस पार्टनर होते. त्यांनी एकमेकांबरोबर अनेक इव्हेंट केले होते. दोघेही एकत्र काम करत असताना प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केले.

हेही वाचा : भर कार्यक्रमात प्रपोज, रोमँटिक डान्स अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरीच्या पतीची खास पोस्ट, डॉ. नेने म्हणाले…

हंसिका व सोहेल यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. त्याचं कारण म्हणजे सोहेलचं हे दुसरं लग्न होतं. सोहेलचं पहिलं लग्न रिंकी बजाज नावाच्या मुलीशी झालं होतं आणि त्यांच्या लग्नात हंसिका नाचतानाही दिसली होती. नंतर सोहेल व रिंकीचा घटस्फोट झाला आणि हंसिकाने सोहेलशी लग्न केलं. हंसिकावर या कारणाने खूप टीका झाली होती. अनेकांनी तिला मैत्रिणीचा संसार मोडून तिच्याच पतीशी लग्न करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र सोहेलने हंसिकावर होत असलेले हे आरोप खोटे व निराधार असल्याचं म्हटलं होतं.

Story img Loader