अभिनेत्री हंसिका मोटवानीने ४ डिसेंबर २०२२ रोजी बॉयफ्रेंड सोहेल खातुरियाशी लग्न केलं होतं. दोघांचा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता. या दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. त्याचं कारण म्हणजे सोहेलचं हे दुसरं लग्न होतं. सोहेलचं पहिलं लग्न रिंकी बजाज नावाच्या मुलीशी झालं होतं आणि त्यांच्या लग्नात हंसिका नाचतानाही दिसली होती. नंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि हंसिकाने सोहेलशी लग्न केलं.
अभिनेत्री हंसिका मोटवानीला आयफेल टॉवरसमोर प्रपोज करणारा सोहेल खातुरिया आहे तरी कोण?
हंसिकाने सोहेलशी लग्न करत असल्याची घोषणा केल्यानंतर तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. अनेकांनी तिला मैत्रिणीचा संसार मोडून तिच्याच पतीशी लग्न करत असल्याचं म्हटलं होतं. या सर्व टीकेबद्दल आता हंसिकाने मौन सोडलं आहे. हंसिका व सोहेलच्या लग्नाची कहाणी डिस्ने+हॉटस्टार प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याचा पहिला एपिसोड आज प्रदर्शित झाला. यामध्ये हंसिका व सोहेल दोघांनीही त्याच्या पहिल्या लग्नावरून होणाऱ्या टीकेबद्द भाष्य केलं.
सोहेल म्हणाला, “माझं आधी लग्न झाल्याची बातमी समोर आली आणि ती चुकीच्या पद्धतीने आली. हंसिकामुळेच माझं ब्रेकअप झालं, लग्न मोडलं, अशा पद्धतीने ते मांडलं जात होतं. खरं तर ते पूर्णपणे असत्य आणि निराधार आहे.”
यावर हंसिकानेही प्रतिक्रिया दिली. “त्यावेळी मी त्या व्यक्तीला ओळखत होते, याचा अर्थ ती माझी चूक होती असं नाही. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मी एक पब्लिक फिगर आहे, म्हणून लोकांसाठी माझ्याकडे बोट दाखवणे आणि मला व्हिलन ठरवणे खूप सोपे होते. सेलिब्रेटी असण्याची मी ही किंमत मोजली,” असा संताप हंसिकाने व्यक्त केला.
अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली…
सोहेल म्हणाला, “माझे पहिले लग्न २०१४ मध्ये झाले होते आणि ते लग्न फार कमी काळ टिकले. पण फक्त आमची मैत्री असल्यामुळे आणि कोणीतरी माझ्या लग्नात ती उपस्थित असल्याचे फोटो पाहिले, म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. अचानक हंसिकाला माझं लग्न मोडण्यास जबाबदार ठरवणाऱ्या बातम्या पाहून मला धक्का बसला होता.”