अभिनेत्री अनुष्का शर्माचा आज १ मे रोजी ३५ वा वाढदिवस आहे. अनुष्का हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या अभिनयाचे असंख्य चाहते आहेत. जवळपास दीड दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अनुष्काने आतापर्यंत विविध कंपन्यांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही काम केलं आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिने काही वर्षांपूर्वी वैचारिक कारणास्तव मोठ्या ब्रँडच्या कोट्यवधींच्या जाहिराती करण्यास नकार दिला होता, त्याबद्दल जाणून घेऊयात.

Ponniyin Selvan 2 box Office Collection : ‘पोन्नियिन सेल्वन: २’ बॉक्स ऑफिसवर सुसाट, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”

अनुष्काला २०१५ मध्ये शॅम्पू ब्रँड ‘पॅन्टीन’ने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं होतं. यावेळी तिने मीडियाशी संवाद साधला होता. तिथे तिने ती कधीही फेअरनेस क्रीम्सचं समर्थन करणाऱ्या जाहिराती करणार नाही, असं सांगितलं होतं. हे वक्तव्य करताना तिने त्यामागचं कारणही सांगितलं होतं. “मी अशा उत्पादनांचे समर्थन करणार नाही जी वर्णभेद, लैंगिक भेदभाव व इतर सामाजिक टॅबूंचा प्रचार करतात. गोरी त्वचा आणि त्यासंदर्भात प्रचार करणाऱ्या उत्पादनांची मी जाहिरात करू इच्छित नाही. एखादी बाब बरोबर किंवा चुकीची आहे, असा प्रचार मी कधीही करणार नाही,” असं अनुष्का म्हणाली होती.

२०१५ च्या नंतरच्या काही अहवालांनुसार, अनुष्काने तिला फेअरनेस क्रीम ब्रँड्सकडून मिळालेल्या काही ऑफर नाकारल्या होत्या, त्यापैकी काही जाहिरातींसाठी तिला कोट्यवधींच्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या. पण तिने आधी म्हटल्याप्रमाणे कोणत्याच फेअरनेस क्रीमची कधीच जाहिरात केली नाही. दरम्यान, अनुष्का या वर्षी झुलन गोस्वामीची बायोपिक ‘चकडा एक्‍सप्रेस’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. ती २०१८ पासून मोठ्या पडद्यावरून दूर आहे.