बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंह आपल्या मधूर आवाजाने सर्वांच्या हृदयावर राज्य करतो. ‘सांवरिया’ चित्रपटातील गाण्यांनी करिअरची सुरुवात करणारा अरिजित सिंह ‘आशिकी-२’मधील गाण्यांनी रातोरात स्टार झाला. यानंतर अरिजितला रोमँटिक गाण्यांचा राजा म्हटले जाऊ लागले. त्याच्या गाण्यांप्रमाणेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील कमी रोमँटिक नाही. अरिजित त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलतो. आज अरिजितच्या वाढदिवसानिमित्त त्याचे दोन विवाह आणि पत्नीबद्दल जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षभरातच मोडले पहिले लग्न

चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करण्यापूर्वी अरिजित सिंह रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत असे. २०१३ मध्ये तो ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोची सह-स्पर्धक रुपरेखा बॅनर्जीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही आणि एकाच वर्षात ते दोघे वेगळे झाले.

“बाळाच्या जन्मानंतर तिला आत्महत्या करायची होती, कारण…”; प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

एका मुलाच्या आईशी दुसरं लग्न

अरिजित सिंहने दुसरे लग्न एका मुलाची आई असलेल्या कोयलशी केले. ती त्याची बालपणीची मैत्रीणही आहे. रुपरेखापासून विभक्त झाल्यानंतर अरिजितने त्याची बालपणीची मैत्रीण कोयल रॉयशी २०१४ मध्ये लग्न केलं. कोयल घटस्फोटीत होती आणि तिला पहिल्या लग्नापासून एक मूलही होते.

अरिजीत सिंहने लपवून ठेवलं लग्न

कोयलशी लग्नाची बातमी अरिजित सिंहने बराच काळ लपवून ठेवली होती. त्यांनी गुपचूप लग्न केले होते. त्यानंतर काही काळाने त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. कोयल रॉयशी आपल्या नात्याचा उल्लेख करताना अरिजित सिंहने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “आम्हा दोघांना चित्रपटांची खूप आवड होती. दोघांनाही मिळून एक पुस्तक लिहायचे होते. आम्ही लहानपणी एकत्र शिकायचो. मीच तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.”

‘किसी का भाई किसी की जान’च्या कमाईत सोमवारी मोठी घट; जाणून घ्या सलमानच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शन

काय करते कोयल रॉय

अरिजित सिंहने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) दरम्यान ‘सा’ नावाच्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाची कथा अरिजित व कोयल रॉय यांनी लिहिली होती. कोयल अरिजितच्या प्रोजेक्ट्समध्ये मदत करते. तिला पुस्तकांची खूप आवड आहे आणि तिला चित्रपट पाहायलाही खूप आवडतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday arijit singh know about divorce second marriage with koel roy love story and personal life hrc