‘टार्झन: द वंडर कार’ या चित्रपटात अजय देवगणच्या मुलाची भूमिका वत्सल सेठने केली होती आणि त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका अभिनेत्री आयशा टाकियाने केली होती. यामध्ये वत्सल आणि आयशाची बोल्ड आणि सिझलिंग केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर ती सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’ चित्रपटात दिसली होती. आज आम्ही तुम्हाला याच आयशा टाकियाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व करिअरबद्दल सांगणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी मरणाऱ्यांपैकी नाही” म्हणणाऱ्या करण जोहरला कंगना रणौतचा जाहीर इशारा; म्हणाली, “नॅशनल टीव्हीवर…”

‘वॉन्टेड’ फेम अभिनेत्री आयशा टाकिया आज १० एप्रिल रोजी तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९८६ मध्ये आजच्या दिवशी मुंबईत तिचा जन्म झाला होता. करिअरच्या सुरुवातीलाच ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली होती. जेव्हा ती यशाच्या शिखरावर होती, तेव्हाच तिला आयुष्यात प्रेम मिळालं आणि तिने करिअर सोडलं. आयशाने इस्लाम धर्म स्वीकारला, प्रियकराशी लग्न केलं आणि ग्लॅमर जगताला अलविदा म्हटलं.

Video: “तुला लाज वाटत नाही का?” विचित्र ड्रेस घातलेल्या जान्हवी कपूरला नेटकऱ्यांनी सुनावलं, भारतीय संस्कृतीची करून दिली आठवण

आयशा टाकियाचा पती समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी आहे. अवघ्या १९ वर्षांची असताना आयशा फरहानच्या प्रेमात पडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि फरहानशी लग्न केले. त्यावेळी ती फक्त २३ वर्षांची होती. दोघांनीही बरेच दिवस आपलं नातं लपवून ठेवलं होतं, पण २००५ मध्ये त्यांचं नातं अधिकृत झालं. ते अनेकदा एकत्र दिसायचे, सुट्टीवरही ते एकत्र जायचे.

फहाद अहमदने स्वराला ‘भाऊ’ म्हणत शुभेच्छा दिल्याने संतापले नेटकरी; म्हणाले, “आपल्या बायकोला…”

आयशाने अल्पावधीत इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करत चांगले नाव कमावले होते, पण तितक्याच कमी वेळात ती इंडस्ट्रीतून गायब झाली. २००९ मध्ये फरहानशी लग्न केल्यानंतर तिने करिअर सोडलं आणि वैवाहिक आयुष्यात रमली. आयशा व फरहानला मिकेल नावाचा मुलगा आहे. दोघेही मुलाबरोबर आनंदाने जगत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday ayesha takia accepted islam religion for marry farhan azmi hrc