‘तेरे नाम’ या चित्रपटातून घरोघरी लोकप्रिय झालेली अभिनेत्री भूमिका चावलाचा जन्म २१ ऑगस्ट १९७८ रोजी दिल्लीमध्ये झाला होता. तिला पहिलाच चित्रपट सुपरहिट झाला. पण करिअरमध्ये तिला फारसं यश मिळालं नाही. आज तिच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भूमिकाने २००३ साली ‘तेरे नाम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात सलमान खानच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारून भूमिकाने आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी भूमिकाने म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये काम केलं होतं. तसेच तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमधून काम केलं होतं.

‘गदर २’ पाहिल्यानंतर हेमा मालिनींनी केलं कौतुक; सनी देओलने सावत्र आईचा फोटो केला शेअर

‘तेरे नाम’नंतर भूमिका चावलाने ‘रन’, ‘सिलसिले’, ‘दिल ने जिस अपना कहा’, ‘दिल जो भी कहे’ इत्यादी चित्रपटांमध्ये अभिनय केला, पण ती प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरली. २०१६ मध्ये, भूमिकाने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. त्यानंतर ती काही महिन्यांपूर्वी आलेल्या सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये झळकली.

भूमिका चावलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्याच्या अवघ्या ४ वर्षातच तिला योगा शिकविणाऱ्या भरत ठाकूर यांच्याशी लग्न केलं. ती फिल्मी दुनियेत येण्याआधीच भरत ठाकूर हे तिचे योगा शिक्षक होते. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २००७ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर २०१४मध्ये ते पालक झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday bhumika chawla love story movies husband bharat thakur hrc
Show comments