बॉलिवूड अभिनेते जितेंद्र वयोमानानुसार आता चित्रपटांमध्ये काम करत नाहीत, पण त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. एकेकाळी त्यांनी दिलेले सुपरहिट चित्रपट आजही प्रेक्षकांना लक्षात आहेत. जितेंद्र प्रचंड लोकप्रिय असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. या वयातही त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात. जितेंद्र यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा होते. जितेंद्र हेमा मालिनींच्या प्रेमात होते, दोघेही लग्न करणार होते, पण असं काही घडलं की हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रशी लग्नगाठ बांधली.

सुनील शेट्टीने जावई केएल राहुलच्या खराब कामगिरीबद्दल केलं भाष्य; म्हणाला, “मी त्याला क्रिकेट…”

Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Shashank Ketkar
“फक्त ७ वर्षं झाली…”, लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता शशांक केतकरची पत्नीसाठी खास पोस्ट; म्हणाला…
Mrunmayee Deshpande Wedding Anniversary lovestory
सहजीवनाची ८ वर्षे! मृण्मयी देशपांडेचं आहे अरेंज मॅरेज; नवऱ्यासाठी लिहिली खास पोस्ट; म्हणाली, “आपण निवडलेला मार्ग…”
akshaya deodhar and hardeek joshi celebrate 2nd wedding anniversary
“माझं प्रेम, माझी राणी…”, राणादाने पाठकबाईंना दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! हार्दिक जोशीची खास पोस्ट…

जितेंद्र यांचा जन्म ७ एप्रिल १९४२ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता. त्यांचे खरे नाव रवी कपूर होते. त्यांनी ७० च्या दशकात चित्रपटांमधील करिअरला सुरुवात केली होती. ‘गीत गाए पत्थरों ने’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांच्या चित्रपटांची इंडस्ट्रीमध्ये खूप चर्चा होते तसेच त्यांची लव्ह लाईफ देखील खूप चर्चेचा विषय होती. शोभा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असूनही त्यांनी हेमा मालिनी यांना डेट करायला सुरुवात केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघेही लग्न करणार होते, पण धर्मेंद्र यांच्यामुळे लग्न होऊ शकलं नाही.

भर कार्यक्रमात पालकांचा दत्तक मुलगा असल्याचं कळालं अन्…; ‘Indian Idol’चा विजेता म्हणाला, “आयुष्यातील हे वास्तव…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोभा कपूर १४ वर्षांच्या असताना जितेंद्र त्यांच्या प्रेमात पडले होते. दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. मरीन ड्राईव्हवर हे जोडपे पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्या दिवसांत जितेंद्र संघर्ष करत होते आणि शोभा ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करत होत्या. शोभा यांना नोकरीमुळे अनेकदा परदेशात जावे लागायचे. अशा परिस्थितीत त्यांची फारशी भेट होऊ शकायची नाही. दरम्यान, जितेंद्र यांचे नाव हेमा मालिनी यांच्याशी जोडले जात होते. दोघंही एकमेकांवर प्रेम करत असल्याचं बोललं जायचं, तसेच त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता, असं म्हटलं जातं.

मृणाल ठाकूरचे बिकिनीतील फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “फॉलोअर्स वाढवण्यासाठी…”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेमा मालिनी यांच्यामुळेच शोभा कपूर आणि जितेंद्र यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. हेमा आणि जितेंद्र लग्न करणार होते पण शेवटच्या क्षणी धर्मेंद्र त्यांच्या मार्गात अडथळा बनले. ते तिथे शोभा कपूरबरोबर पोहोचले होते, त्यानंतर बराच गोंधळ झाला आणि त्यांचे लग्न मोडले. त्यानंतर जितेंद्र पुन्हा एकदा शोभा कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आले आणि ३१ ऑक्टोबर १९७४ रोजी दोघांनी गुपचूप लग्नगाठ बांधली होती.

Story img Loader