बॉलिवूडमधील टॉपच्या दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणजे करण जोहर. करणने आजवर विविध कलाकृती प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. रुपेरी पडद्यावर त्याच्या या प्रयत्नांना यशही मिळालं. इतकंच नव्हे तर काही स्टार किड्सलाही त्याने बॉलिवूडमध्ये लाँच केलं. करण त्याच्या कामाव्यतिरिक्त खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. त्याच्या आयुष्यात कोण खास व्यक्ती होती का? याबाबत अनेक चर्चाही रंगताना दिसल्या. करणचा आज वाढदिवस आहे. याचनिमित्त करणबाबत काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण अजूनही अविवाहित आहे. पण काही वर्षांपूर्वी सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्विकारण्याचा त्याने निर्णय घेतला. तो दोन जुळ्या मुलांचा बाबा आहे. रुही व यश अशी त्याच्या मुलांची नावं आहेत. पण करण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. एका मुलाखतीदरम्यान त्याने स्वतः याबाबत खुलासा केला होता.

आणखी वाचा – ५१व्या वर्षी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू, निधनापूर्वी नितेश पांडे कुठे होते? अभिनेत्याच्या मृत्यूबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीची नवी माहिती

करण चक्क अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या प्रेमात होता. ट्विंकलच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात करणने याबाबत भाष्य केलं होतं. तो म्हणाला, “माझ्या आयुष्यामध्ये एकाच मुलीच्या मी प्रेमात पडलो. ती मुलगी म्हणजे ट्विंकल खन्ना होती”. करणच्या या वक्तव्यानंतर ट्विंकलनेही याबाबत भाष्य केलं होतं. करण तिच्या प्रेमात होता हे तिने मान्य केलं.

आणखी वाचा – नितेश पांडेंची शेवटची पोस्ट पाहून चाहतेही हळहळले, तीन महिन्यांपूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

ट्विंकल म्हणाली, “करण माझ्यावर प्रेम करायचा. त्याला माझी छोटी मिशी आवडायची. तुझी मिशी किती छान आहे असं तो मला सतत म्हणायचा”. पांचगणी येथील एका बोर्डिंग शाळेमध्ये करण व ट्विंकल एकत्र शिक्षण घेत होते. शाळेत असतानाच करण ट्विंकलच्या प्रेमात होता. मात्र ट्विंकल कधीच करणच्या प्रेमात पडली नाही. अखेर २००१मध्ये अक्षय व ट्विंकल विवाहबंधनात अडकले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday karan johar actor director fell in love with akshay kumar wife twinkle khanna know about his love story see details kmd