बॉलिवूड अभिनेत्रींच्या कामाबरोबरच त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरतं. त्यातील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे रत्ना पाठक शाह. रत्ना यांचा आज ६६वा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेर सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. त्याचबरोबरीने रत्ना यांचं वैवाहिक आयुष्य कायमच चर्चेत राहिलं आहे. रत्ना यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
१९७५मध्ये नसीरुद्दीन एफटीआयआयमध्ये शिक्षण घेत होते. तर रत्नाही महाविद्यालयामध्ये शिकत होत्या. यादरम्यानच दोघांनीही नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. एका नाटकादरम्यान या दोघांची ओळख झाली. सत्यदेव दुबे दिग्दर्शित हे नाटक होतं. ओळख झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच रत्ना व नसिरुद्दीन एकत्र फिरायला गेले होते.
आणखी वाचा – …तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…
या भेटीनंतरच रत्ना व नसीरुद्दीन यांच्यामध्ये जवळीक वाढली. दरम्यान या दोघांनी जेव्हा लग्न करण्याचं ठरवलं तेव्हा नसीरुद्धीन यांनी पहिल्या पत्नी परवीन मुराद (मनारा सिकरी) यांच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. रत्ना व नसीरुद्दीन काही वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर १ एप्रिल १९८२मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले. पण रत्ना व नसीरुद्दीन यांनी अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं.
दोघांनी ना पारंपरिक लग्न केलं ना त्यांचा निकाह झाला. ‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रत्ना यांनी त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. रत्ना यांची आई दीना पाठक यांच्या उपस्थित त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर रत्ना व नसीरुद्दीन यांनी खूप मजा मस्ती केली. समुद्रकिनारी रोमँटिक होत एकमेकांबरोबर एकत्रित वेळ घालवला. स्विमिंगही केलं तसेच रत्ना व नसीरुद्दीन एकत्र दारूही प्यायले. पण या दोघांच्या लग्नामध्ये कोणतेही विधी झाले नाहीत. रत्ना व नसीरुद्दीन यांचं लग्न चर्चेचा विषय ठरलं होतं.