‘बंटी बबली २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघचा आज २७वा वाढदिवस आहे. शर्वरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. शर्वरीचा जन्म १४ जून १९९६ रोजी मुंबईत झाला. तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत. तर, तिची बहीण कस्तुरी आणि आई नम्रता वाघ या दोघी आर्किटेक्ट आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Video: “आवडती व्यक्ती” म्हणत जय दुधाणेने शेअर केला मिस्ट्री गर्लबरोबरचा रोमँटिक व्हिडीओ, ‘ती’ कमेंट करत म्हणाली…

शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. २०१५ मध्ये तिने पहिल्यांदा ‘प्यार का पंचनामा २’ साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. यानंतर तिने ‘बाजीराव मस्तानी’मध्ये व ‘सोनू के टीटू की स्विटी’मध्येही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. यानंतर शर्वरीला अभिनेत्री म्हणून बॉलिवूडचा पहिला चित्रपट मिळाला.

अगदी लहान फिल्मी करिअरमध्ये शर्वरीने दोन मोठे पुरस्कार जिंकले आहेत. ‘बंटी और बबली २’ चित्रपटातील सर्वोत्तम पदार्पणासाठी तिला २०२२ मध्ये आयफा पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. शर्वरी लवकरच ‘सितारा के तारे’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

कपिल शर्माच्या शोमधील अभिनेत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाइव्हदरम्यान उचललं धक्कादायक पाऊल, कारण…

दरम्यान, शर्वरी अभिनेता विकी कौशलचा भाऊ व कतरिना कैफचा दीर सनी कौशलला डेट करत असल्याच्याही खूप चर्चा आहेत. सनी व शर्वरी अनेक कार्यक्रमांना सोबत हजेरी लावतात, तसेच ते एकत्र वेळ घालवतानाही दिसतात. पण त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नाही, त्यामुळे या चर्चांबद्दल कोणतीही स्पष्टता नाही.