बॉलिवूडच्या उत्तम अभिनेत्रींपैकी एक व आपल्या फिटनेससाठी विशेष ओळखली जाणारी शिल्पा शेट्टी आज तिचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पा तिच्या कामाव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. शिल्पा मागे काही काळ पती राज कुंद्रावरील आरोपांमुळे चर्चेत होती. राजबरोबर लग्न करण्यापूर्वी शिल्पाचं अक्षय कुमारबरोबर अफेअर होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

दोघांनी ‘धडकन’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं, त्यानंतर कधीच ते एकत्र दिसले नाही. या चित्रपटानंतर दोघांच्या रिलेशनशिपबद्दल जोरदार चर्चा होती. पण, हे नातं एका वाईट वळणावर संपलं, असं म्हटलं जातं. अक्षयने शिल्पाची फसवणूक केली होती, त्यामुळे दोघे वेगळे झाले. झालं असं की अक्षय कुमार आणि शिल्पा रिलेशनशिपमध्ये असताना अक्षयची भेट ट्विंकल खन्नाशी झाली. दोघांनी ‘इंटरनॅशनल खिलाडी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अक्षयला ट्विंकल इतकी आवडली की त्याने तिला चित्रपटाच्या सेटवरच लग्नासाठी प्रपोज केलं आणि नंतर लग्नही केलं.

हेही वाचा – सनी देओलमुळे राजेश खन्ना यांना घटस्फोट न देता २७ वर्षे वेगळ्या राहिलेल्या डिंपल कपाडिया?

दोघांच्या लग्नानंतर शिल्पाने अक्षयसोबतच्या ब्रेकअपवर भाष्य केलं होतं. एका मुलाखतीत शिल्पा म्हणाली होती, “जेव्हा मी अक्षयला भेटले तेव्हा मला वाटलं की तोच माझं जग आहे. हे नातं संपलं तर मीही संपेन. पण आज ते नातं राहिलं नाही. ते नातं नाहीये, याचं आज मला खूप समाधान वाटत आहे. जो जवळ राहत नाही आणि नजरेतून दूर जातो, तो आपोआप दूर जातो.” अक्षय तिच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना ट्विंकलला डेट करू लागला होता, असंही शिल्पाने म्हटलं होतं. यासंदर्भात ‘जनसत्ता’ने वृत्त दिलंय.

ट्विंकल खन्नामुळे तिचं आणि अक्षयचं नातं तुटलं होती, पण शिल्पाच्या मनात ट्विंकलबद्दल कोणताही राग नव्हता. “मला ट्विंकलबद्दल कोणतीही तक्रार नाही. या सगळ्यात तिचा दोष नाही. माझ्याच बॉयफ्रेंडने माझी फसवणूक केली तर समोरच्या स्त्रीचा काय दोष. अक्षयने माझा वापर केला आणि त्याच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलं तेव्हा त्याने मला सोडून दिलं,” असं ती म्हणाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday shilpa shetty reaction when boyfriend akshay kumar cheated her for twinkle khanna hrc