कलाकारांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. कलाकारांतं अफेअर, रिलेशनशिप, लग्न, घटस्फोट याबाबत तर अनेक चर्चा रंगताना दिसतात. अशीच एक सुप्रसिद्ध अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरली होती. ती अभिनेत्री म्हणजे तनाज ईरानी. आज तनाजचा वाढदिवस. तनाजने बॉलिवूडसह छोट्या पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. हिंदी मालिकांमुळेच ती नावारुपाला आली. पण तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत कायमच चर्चा रंगल्या.
अगदी कमी वयामध्ये तनाजने फरीदबरोबर पहिलं लग्न केलं. २०व्या वर्षी तिने मुलीला जन्म दिला. मात्र तिचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. तनाज व फरीदचा घटस्फोट झाला. तिची मुलगी फरीदबरोबरच राहू लागली. घटस्फोटानंतर मात्र तनाजने हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. लहान वयातच तनाजला घटस्फोटाचं दुःख सहन करावं लागलं. पण तिने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”
हिंदी मालिकांमध्ये काम करत असताना ती अभिनेता बख्तयार ईरानीच्या प्रेमात पडली. तनाज बख्तयारपेक्षा ८ वर्षांनी मोठी होती. म्हणूनच बख्तयारच्या कुटुंबियांचा या दोघांच्या नात्याला विरोध होता. पण बख्तयार व त्याची बहीण अभिनेत्री डेलनाज ईरानीने कुटुंबियांना या लग्नासाठी तयार केलं. त्यानंतर १६ मार्च २००७मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले. आता तनाज व बख्तयार सुखाचा संसार करत आहेत.
आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”
तनाज व बख्तयारला दोन मुलं आहेत. तनाजने दुसरं लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्रातही नशिब आजमावलं. ‘हद कर दी आपने’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ‘कुछ ना कहो’, ’३६ चायना टाऊन’ सारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. इतकंच नव्हे तर हिंदी मालिकांमुळे ती घराघरांत पोहोचली.