२०१५ साली आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. तिचं स्वतःचं युट्यूब चॅनलदेखील आहे. हर्षालीला काही ट्रोलर्सनी ट्रोल केलं आहे, त्यांना तिने सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”
सलमान खान आणि करीना कपूर खान यांच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या हर्षालीने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं. ट्रोलर्सनी तिच्या कुटुंबाचा उल्लेख केल्याने हर्षाली संतापली. युजरने तिची तुलना बाल कलाकार रुहानिका धवनशी देखील केली.
शाहरुख खान की नवाब मलिक, सर्वात जास्त राग कुणाचा येतो? समीर वानखेडे म्हणाले, “कुठला…”
ट्रोलरने लिहिलं, “मला एक गोष्ट समजत नाही, लोकांना या मुलीमध्ये काय दिसतं? चांगली दिसत नाही, चांगला अभिनय येत नाही, फक्त दुसऱ्यांची कॉपी करते. आधी रुहानिकाचे यूट्यूब चॅनल बघून तिनेही चॅनल सुरू केले, मग कथ्थक, मग ती जे काही करते, तेच सगळं ही कॉपी करते. हिचं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही, फक्त लोकांची कॉपी करून वाईट जीवन जगतेय. हिला व तिच्या कुटुंबाला फक्त दुसऱ्यांचा द्वेष करणं आणि कॉपी करणं येतं. सुधर आता तरी, अभिनय करणं तुला जमणार नाही.”
हर्षाली या ट्रोलरला उत्तर देत म्हणाली, “कुणाच्याही कुटुंबाबद्दल बोलणाऱ्यांनो लाज तुम्हाला वाटायला हवी. तुमच्या कमेंट्सवरूनच तुमचे स्टँडर्ड्स कळतात. हिंमत नसल्याने फेक अकाउंट बनवून फक्त कमेंट्स करता येतं. आणि रुहानिकाबद्दल बोलायचं झाल्यास तिने कथक किंवा युट्यूबचा कॉपिराइट घेतला आहे का? की दुसरं कोणीही ते करू शकत नाही.”
तिने आणखी एका ट्रोलरला उत्तर दिलं. “मला काहीच फरक पडत नाही, मला जे करायचं आहे तेच मी करेन. पण कोणीही इतरांच्या कुटुंबाबद्दल बोलू नये,” असं ती म्हणाली.
दरम्यान, हर्षाली ट्रेंडिंग गाण्यावरील रील्स सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच तिच्या कथक प्रॅक्टिसचे व्हिडीओदेखील चाहत्यांशी शेअर करत असते.