Actor Shekhar Suman Joins BJP: देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडतंय. याचदरम्यान एका लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. १५ वर्षांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवल्यानंतर या अभिनेत्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमध्ये या अभिनेत्याची महत्त्वाची भूमिका होती.
भाजपावासी झालेल्या या अभिनेत्याचं नाव शेखर सुमन आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘हीरामंडी’ मध्ये महत्त्वाचं पात्र साकारणाऱ्या शेखर सुमन यांनी पुन्हा राजकारणात पाऊल ठेवलं आहे. मंगळवारी भाजपाच्या मुख्यालयात विनोद तावडे आणि अनिल बलूनी यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत शेखर सुमन यांनी पक्षात प्रवेश केला.
माहित नव्हतं की आज इथे असेन – शेखर सुमन
पक्ष प्रवेशानंतर शेखर सुमन म्हणाले, “मला कालपर्यंत माहित नव्हतं की आज मी इथे असेन. आयुष्यात कळत- नकळत खूप काही घडत असतं. कधी कधी तुम्हाला काय करायचं आहे ते कळत नाही आणि तुम्हाला वरून दिशा मिळते आणि तुम्ही त्या दिशेचं पालन करता, तेच मी केलंय. मी इथे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आलो आहे. मला येथे येण्याचे आदेश दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.”
भाजपात सामील झाल्यावर काय म्हणाले शेखर सुमन?
“जे प्रभू राम यांनी ठरवलंय, तेच आपण करायचं आहे. माझ्या मनात कोणतेही नकारात्मक विचार नाहीत, मी फक्त देशाचा विचार करतो. बोलण्यात आणि बोललेलं प्रत्यक्षात करण्यात फरक आहे. मी लांबलचक भाषण देऊ शकतो, पण मी काहीतरी करून दाखवल्यावरच त्या भाषणाला अर्थ असेल,” असं शेखर सुमन म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले.
१५ वर्षांपूर्वी लढवली होती निवडणूक
शेखर सुमन दुसऱ्यांदा राजकारणात आले आहेत. याआधी त्यांनी एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पटना साहिबमधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, पण भाजपाचे तत्कालीन उमेदवार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्या निवडणुकीत शेखर सुमन तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.