‘हीरामंडी- द डायमंड बझार’ या वेब सीरिजमध्ये ताजदारच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता ताहा शाह सध्या चर्चेत आहे. ताह शाहने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो कान फेस्टिवलमध्ये का जेवला नव्हता याबद्दल सांगितलं.
ताह शाह म्हणाला की ‘हीरामंडी’नंतर मला एवढं कळलं की, कोणतीही संधी मिळण्यासाठी तेवढाच प्रयत्न करायचा आणि कधीच प्रसिद्धीने संतुष्ट व्हायचं नाही. शोच्या यशानंतर ताह कान फिल्म फेस्टिवलला गेला होता. त्यादरम्यान जी लोकं त्याला ओळखत नाहीत त्यांच्याशी तो संवाद साधत होता. नुकत्याच झूमला दिलेल्या मुलाखतीत ताह शाह म्हणाला, “जेव्हा त्यांना कळायचं की मी ‘हीरामंडी’ ही वेब सीरिज केलीय. तेव्हा ते म्हणायचे की, हा इतकं मोठं काम करून आलाय. हा इथे का फिरतोय. कारण त्यांची अशी विचारसारणा असते की, जर तुम्ही स्टार झालात तर लोकं तुमच्याकडे यायला पाहिजेत. पण माझा यावर विश्वास नाही. मी ज्या गोष्टी आधी करत होतो त्या करणं मी असंच बंद का करू? जर त्याच गोष्टींनी मला इथवर पोहोचवलं आहे.”
ताह शाह पुढे म्हणाला, “मी मेहनत करतो. जर कोणी येऊन मला हॅलो म्हटलं नाही तर मी ते करतो. जर १०० लोकं तुम्हाला ओळखत असतील. तर त्यातली ९५ लोकं असं गृहीत धरतील की यशस्वी झाल्यानंतर तुम्ही समोरून कोणाशी बोलायला जाणार नाही आणि यामुळे ते काय तुम्हाला स्क्रिप्ट ऑफर करत नाहीत. म्हणून जर तुम्ही मला येऊन भेटत नसाल तर मी तुम्हाला येऊन भेटेन. मी माझ्या टीमला सांगतो की, मला सगळ्यांना भेटायचं आहे आणि माझं असं एक वैयक्तिक नात सगळ्यांशी जोडायचंय.”
ताह शाह असंही म्हणाला की, “इंडस्ट्रीत नवीन असल्यासारखाच तो सगळ्यांना भेटायाला जायचा. ताह शाह म्हणाला, मी सगळ्यांना सांगत होतो कृपया काही काम असेल तर मला कॉल करा. मी प्रत्येक स्टॉलवर जात होतो. सगळ्या चित्रपट आयुक्तांना भेटत होतो. असं नाही आहे की ते उद्या सकाळीच मला काही काम देतील. पण तुम्हाला माहित नसतं की कधी काय घडेल. माझ्या कामासाठी मला माझं जेवण किंवा झोपं गमावण्यास काही हरकत नाही. जेव्हा मी कानला होतो तेव्हा मी जेवलोच नाही. जर तुम्हाला जेवायचं असेल तर तिथे नक्कीच दीड ते दोन तास तुमचे वाया जातात. तेव्हा मी दोघांपैकी एकच करू शकत होतो. एकतर जेवू शकत होतो किंवा माझे संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करू शकत होतो आणि तेव्हा मी दुसरा पर्याय निवडला. जेवणाचं काय, मी नंतर कधीही जेवू शकतो. “