Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त देशभरात उत्सव व उत्साहाचं वातावरण आहे. सेलिब्रिटींसह अनेक लोक अयोध्येला पोहोचत आहेत. २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. अशा परिस्थितीत या मंदिराच्या उभारणीसाठी सामान्यांपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच देणगी दिली आहे. यामध्ये अक्षय कुमारपासून हेमा मालिनीपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. कुणी विटा दान केल्याचं सांगितलं जातंय तर कुणी पैशांची देणगी दिली आहे.

हेमा मालिनी

ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिली आहे. मात्र, त्यांनी किती देणगी दिली, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. यासोबतच त्यांनी लोकांना रक्तदान करण्याचे आवाहनही केले आहे.

Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
elvish yadav reacts on video with hardik pandya ex wife Natasa Stankovic
हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी नताशाबरोबरचा ‘तो’ व्हिडीओ जाणूनबुजून टाकला? एल्विश यादव म्हणाला, “मी त्यादिवशी…”
Marathi actress Shivani sonar will wear panaji nath in wedding
Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
narendra modi Maha Kumbh Mela
पंतप्रधान मोदी यांच्याकडून ‘अक्षयवट’ची पूजा, महाकुंभमेळ्यानिमित्त विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन
nana patekar praised madhuri dixit
“त्या चित्रपटाच्या ३०-३५ वर्षांनंतरही माधुरीमुळे ती…”, नाना पाटेकर माधुरी दीक्षितबद्दल काय म्हणाले?
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका

१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून वेगळी झाली मराठमोळी अभिनेत्री, पण घटस्फोट घेणार नाही; कारण…

मनोज जोशी

बॉलिवूड अभिनेते मनोज जोशी यांनीही राम मंदिरासाठी देणगी दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ते राम मंदिरासाठी गुप्त दानही केल्याचं म्हणत होते. त्यांनी लोकांनाही दान करण्याचे आवाहनही केले आहे.

अक्षय कुमार

‘इंडिया टाइम्स’च्या वृत्तानुसार, अक्षय कुमारने राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठी रक्कम दान केली आहे. खुद्द अक्षय कुमारने एक व्हिडीओ शेअर करून मंदिराच्या बांधकामासाठी देणगी दिलेल्या रकमेचा खुलासा केला आहे. मात्र, किती रक्कम दिली याबाबत सांगितलं नाही.”अयोध्येत आपल्या भव्य श्रीराम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे ही आनंदाची बाब आहे. आता आपले योगदान देण्याची वेळ आहे. मी सुरुवात केली आहे. तुम्हीही आमच्यात सहभागी व्हाल अशी आशा आहे. जय सिया राम,” असं अक्षयने म्हटलं होतं.

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

गुरमीत चौधरी

गुरमीत चौधरीने ट्वीट करून राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिल्याची माहिती दिली. “तुम्हाला माहिती आहे की राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याचे काम संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात सुरू आहे. या शुभ कार्यासाठी आपणही प्रभू रामाच्या चरणी काही मदत करू इच्छितो. जय श्री राम,” असं त्याने म्हटलं होतं.

प्रणिता सुभाष

दाक्षिणात्य आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रणिता सुभाषने ट्विट करून श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती दिली. तिने स्वतः व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

पती नुपूर शिखरेपेक्षा तब्बल ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे आयरा खान; आमिर खानची लेक २६ वर्षांची, तर जावई…

मुकेश खन्ना

‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिल्याची माहिती दिली. त्यांनी १,११,१११ रुपये देणगी दिली.

पवन कल्याण

दाक्षिणात्य स्टार पवण कल्याणने राम मंदिरासाठी ३० लाख रुपये दान केले.

अनुपम खेर

‘इंडिया टाइम्स’च्या वृत्तानुसार, अभिनेते अनुपम खेर यांनी राम मंदिरासाठी पैसे नव्हे तर वीट दान केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ते राम मंदिर पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “मित्रांनो! मी तुम्हाला अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिराची झलक दाखवत आहे. हे विशाल मंदिर बांधताना पाहून खूप आनंद झाला. अयोध्येच्या संपूर्ण वातावरणात जय श्री रामचा जयघोष आहे.”

Story img Loader