प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याबरोबर पहिलं लग्न केलं होतं. त्यांना चार मुलं झाली; सनी देओल, बॉबी देओल आणि अजेता आणि विजेता या दोन मुली होत्या. धर्मेंद्र यांनी पुढे १९८० साली ४५ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबरोबर दुसरा विवाह केला आणि त्यांना ईशा देओल आणि अहाना देओल अशा दोन मुली झाल्या. धर्मेंद्र आपल्या सर्व सहा मुलांना सारखंच महत्त्व देत असले तरी त्यांनी मुलींसाठी काही नियम ठरवले होते. धर्मेंद्र यांना मुलींनी तोकडे कपडे घातलेले आवडायचे नाही, तसेच ते मुलींना बाहेरगावी प्रवास करण्याची परवानगी द्यायचे नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सिमी गरेवाल यांच्या एका जुन्या मुलाखतीत, हेमा मालिनी यांनी त्यांच्या मुलींसाठी धर्मेंद्र कसे वडील होते याबद्दल सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, “धर्मेंद्र जेव्हा मुंबईत येतात, तेव्हा ते आपल्या मुलींना भेटायला वेळ काढतात आणि त्यांच्याशी त्यांच्या अभ्यासाबद्दल बोलतात. मुलींच्या कपड्यांबद्दल त्यांचं खूपच लक्ष असतं. त्यांना मुलींनी नेहमी सलवार-कुर्ता परिधान करावं असं वाटतं. जेव्हा ते घरी येणार असतात, तेव्हा मुली सलवार-कुर्ता घालतात. धर्मेंद्र यांना जीन्स चालते, पण त्यांना सलवार कुर्त्यांची आवड आहे. मी मुलींना सांगते, तुमच्या वडिलांना हे आवडतं, त्यांच्यासाठी ते परिधान करा.” या मुलाखतीच्या वेळी ईशा १७ वर्षांची तर आहाना १४ वर्षांची होती.
हेही वाचा…अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
धर्मेंद्र यांच्या पारंपरिक विचारधारेबद्दल बोलताना हेमा मालिनी पुढे म्हणाल्या होत्या, “ते खूपच पारंपरिक आणि संवेदनशील आहेत. माझ्या जगभर गाजणाऱ्या नृत्याच्या कार्यक्रमांपैकी त्यांनी एकही कार्यक्रम अजून पाहिलेला नाही. कारण त्यांना वाटतं की स्टेजवर मी खूप वेगळी दिसते आणि तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा भाग नसते.”
‘मुलींनी चित्रपटसृष्टीत येऊ नये’
या मुलाखतीत ईशा देओलही आपल्या आईबरोबर होती. जेव्हा तिच्या चित्रपटात येण्याच्या इच्छेबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली होती, “मला अभिनयात रस आहे, पण शेवटी निर्णय वडिलांचाच असेल.” याच मुलाखतीत हेमा मालिनी पुढे म्हणाल्या होत्या, “मी एकदा धर्मेंद्र यांच्याशी याबाबत बोलले होते, पण त्यांनी ‘बिल्कुल नाही’ असं ठाम सांगितलं. मुलींच्या जन्मापासूनच त्यांनी यावर ठाम भूमिका घेतली होती. मुलींनी नृत्य शिकावं याबाबत त्यांची परवानगी होती, पण त्यांनी चित्रपटात येण्यास त्यांची ना होती.”
ईशा पुढे म्हणाली होती, “वडील आमची खूप जास्त काळजी करतात. ते आम्हाला सांगतात की, ‘मुलींनो, तुम्ही फक्त घरात बसायचं आहे.’ आम्हाला बाहेर जाऊ देण्यास ते फारसे उत्सुक नसतात, पण मम्मा असल्यामुळे आम्हाला क्रीडा स्पर्धांसाठी थोडं बाहेर जाणं चालतं. बाहेरगावच्या स्पर्धांसाठीही ते विरोध करतात. ते आम्हाला बिनबाहींचे (स्लीव्हलेस) किंवा तोकडे कपडे घालू देत नाहीत, त्यामुळे वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालतो.”
हेही वाचा…हृतिक रोशन-सुझान खानची मुलं झाली मोठी, फोटो पाहून चाहते म्हणाले, “ते बॉलीवूडचे…”
हेमा मालिनी यांनी याच मुलाखतीत सांगितलं होतं की, “मुलींना आधुनिक (मॉडर्न) कपडे घालायला आवडतं. मी त्यांना काही प्रमाणात आधुनिक कपडे घालण्याची परवानगी देते, पण त्याच वेळी पारंपरिक पोशाखही घालावे लागतात.”
“मी १८ व्या वर्षी लग्न करावं अशी वडिलांची इच्छा होती”
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओलने सांगितलं होत, “वडिलांना मी चित्रपटसृष्टीत यावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांची विचारधारा पारंपरिक होती. त्यामुळे त्यांना मी १८ व्या वर्षी लग्न होऊन आयुष्यात सेटल व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याच विचारसरणीतून आली आहे. त्यांच्या कुटुंबातील महिलाही असंच आयुष्य जगत होत्या. पण, माझं याबाबतीत वेगळं मत होतं; कारण आई चित्रपटांमध्ये होती, तिचं नृत्य पाहून माझ्या मनातही त्याचं बीज रुजलं होतं, त्यामुळे मला काहीतरी मोठं करायचं होतं.”