धर्मेंद्र यांचा नातू व सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने ८ जून रोजी द्रिशा आचार्यबरोबर लग्न केले. करणच्या लग्नानंतर देओल कुटुंब चर्चेत आलं आहे. या लग्नात देओल कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सहभागी झाली होती. मात्र, धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली ईशा, अहाना या लग्नापासून लांब राहिल्या होत्या. दरम्यान एका जुन्या मुलाखतीत ईशा आणि हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याबदद्ल एक मोठा खुलासा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video: “त्याला सॉरी म्हण”; रणबीर कपूरने आलिया भट्टला मागायला लावलेली चहा विक्रेत्याची माफी; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

काही वर्षांपूर्वी सिमी गरेवाल यांच्या चॅट शोमध्ये ईशा आणि हेमा मालिनी सहभागी झाल्या होत्या. या मुलाखतीत माय-लेकीने धर्मेद्र यांच्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. हेमा मालिनी म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा ते मुंबईत असायचे तेव्हा तेव्हा ते मुलींना भेटायला यायचे. मुलींची आवर्जून चौकशीही करायचे. त्यांना मुलींनी सिव्हलेस ड्रेस घातलेले बिलकूल आवडायचे नाहीत. त्यामुळे ते येणार आहेत हे कळल्यावर ईशा आणि अहाना पूर्ण बाह्यांचे ड्रेस घालायचे.”

यावेळी ईशाने धर्मेंद्र यांच्याशी निगडीत एक किस्साही शेअर केला होता. ईशा म्हणालेली, “माझे वडील रुढी परंपरा जपणारे आहेत. आम्हाला खेळासाठीही एकटं बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. एकदा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मला बाहेर जायचे होते. मात्र, वडिलांनी परवानगी दिली नाही. म्हणून मी नाही गेले.”

हेही वाचा- “तुझ्या आणि विकीमध्ये…” ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट बघून आजी शर्मिला यांनी साराला केला मेसेज, म्हणाल्या…

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० साली लग्नगाठ बांधली. मात्र, हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते होते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना त्यांना चार अपत्य आहेत. सनी देओल आणि बॉबी देओल आणि दोन मुली अजिता देओल आणि विजेता देओल. तर हेमा मालिंनी आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि अहाना अशा दोन मुली आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini and esha deol revelations about dharmendra dpj