Hema Malini Video: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री व खासदार हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक चाहती हेमा मालिनी यांच्याजवळ फोटो काढायला येते आणि खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यानंतर त्यांनी जे केलं त्यावरून सोशल मीडियावर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमा मालिनी या सोशल मीडियावर सक्रिय आहेत. खासदार व अभिनेत्री म्हणून त्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. सामाजिक व मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमांमध्ये हेमा मालिनी उपस्थित राहतात. अशाच एका कार्यक्रमातील त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

नुकतीच हेमा मालिनी यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्या माध्यमांना पोज देत उभ्या होत्या. असताना तिथे एक मध्यमवयीन महिला त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी आली. खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. यावर हेमा मालिनी तिला ‘हात लावू नकोस’ असं म्हणाल्या. तिथे आणखी एक माणूस आला, त्यानेही महिलेला हात ठेवण्यापासून रोखलं. त्यानंतर हेमा मालिनी सरळ उभ्या राहिल्या आणि ती महिला फोटो काढून निघून गेली.

Munjya on TV: सुपरहिट ‘मुंज्या’ OTT नव्हे तर टीव्हीवर होतोय प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

विरल भयानीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. हेमा मालिनी यांना बरेच जण ट्रोल करत आहेत, तर काहींनी त्यांची बाजू घेतली आहे.

कुठे आहे ‘मोहरा’तील ही अभिनेत्री? १८ वर्षांनी साध्वीच्या रुपात दिसली अन्…; आता करते ‘हे’ काम

‘लोकांनी ही गोष्ट निवडणुकांवेळी लक्षात ठेवायला हवी’, ‘जया बच्चन व हेमा मालिनी या सर्वात चिडखोर महिला सेलिब्रिटी आहेत’, ‘निवडणुकांवेळी याच लोकांच्या घरी जाऊन मतांची भीक मागतात, चाहत्यांची चूक आहे ते अशा लोकांबरोबर फोटो काढायला जातात’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच हेमा मालिनींना स्पर्श करू नकोस असं सांगायला आलेल्या त्या माणसाने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला याकडेही काही नेटकऱ्यांनी लक्ष वेधलं आहे.

व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

हेमा मालिनी यांच्या या व्हिडीओवर काहींनी त्यांची बाजू घेतली आहे. त्यांची परवानगी न घेता त्यांना स्पर्श करणं चुकीचं आहे. त्या कंफर्टेबल नसतील तर त्यांनी तशी प्रतिक्रिया देणं साहजिक आहे, असं काही जणांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini asked fan not to touch netizens reacted on viral video hrc