हिंदी चित्रपटसृष्टीमधील ड्रीम गर्ल म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज ७४वा वाढदिवस आहे. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. हेमा मालिनी यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान फार मोठं आहे. आपल्या कामामुळे त्या सतत चर्चेत राहिल्याच. पण त्याचबरोबरीने हेमा मालिनी यांचं खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेचा विषय ठरलं. १९८०मध्ये धर्मेंद्र व हेमा यांचा विवाहसोहळा पार पडला. पण लग्न करण्यासाठी दोघांनाही खूप मेहनत करावी लागली. धर्मेंद्र व हेमा मालिनी यांच्या हटके प्रेमकथेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
‘तुम हसीन मैं जवान’ चित्रपटामध्ये धर्मेंद्र व हेमा मालिनी एकत्र दिसले. या चित्रपटाच्या सेटवरच दोघं पहिल्यांदा भेटले. त्यानंतर धर्मेंद्र व हेमा यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली. एका चित्रपटाच्या सेटवर तर धर्मेंद्र यांनी सगळ्यांसमोर तू माझ्यावर प्रेम करतेस का? असं हेमा मालिनी यांना विचारलं. हेमा व धर्मेंद्र यांचं लग्न होणं अशक्य होतं. यामागे कारणही तितकंच वेगळं आहे.
धर्मेंद्र यांचं आधीच प्रकाश कौर यांच्याबरोबर लग्न झालं होतं. इतकंच नव्हे तर त्यांना मुलंही होती. अशामध्ये दुसरं लग्न करणं त्यांना शक्य नव्हतं. आपल्या पहिल्या पत्नीला धर्मेंद्र अधिकृतरित्या घटस्फोटही देण्यासही तयार नव्हते. यासाठी चक्क धर्मेंद्र यांनी आपला धर्म बदलला.
आणखी वाचा –
आणखी वाचा – घरी बोलावलं, सेक्सबाबत प्रश्न विचारला अन्…; प्रसिद्ध अभिनेत्रीचे साजिद खानवर गंभीर आरोप
त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारत स्वतःचं नाव दिलावर खान असं ठेवलं. तर हेमा मालिनी यांनी स्वतःचं नाव बदलून आयशा बीआर चक्रवर्ती असं ठेवलं. त्यानंतरच दोघांनी १९८०मध्ये लग्न केलं. या दोघांची ही हटके लव्हस्टोरी आजही तितकीच चर्चेत आहे. आता या दोघांच्या संसाराला ४२ वर्ष पूर्ण झाली आहेत.