दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ज्यामुळे चाहते चिंतेत पडले आहेत. ईशा तिच्या अभिनय करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते आणि आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातच मोठं वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. ईशा तिचा पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे, अशा चर्चा सध्या होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतंच एका सोशल मीडिया युजरने रेडिटवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने ईशा आणि भरत एकमेकांपासून वेगळे झाल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ते आता सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाहीत. इतकंच नाही तर या पोस्टमध्ये युजरने भरत आपल्या पत्नीची फसवणूक करत असल्याचा दावाही केला आहे.

ट्विंकल खन्नाने ५० व्या वर्षी पूर्ण केलं शिक्षण; अक्षय कुमार पत्नीचं कौतुक करत म्हणाला, “मी शिकलो असतो तर…”

नवीन वर्षाच्या दिवशी बेंगळुरूमध्ये एका पार्टीत आपण ईशाचा पती भरतला पाहिलं होतं, असा दावाही युजरने त्याच्या पोस्टमध्ये केला आहे. त्या पार्टीत भरत त्याच्या एका कथित गर्लफ्रेंडसोबत होता. भरतची गर्लफ्रेंड बंगळुरूमध्येच राहते असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, या वृत्तांवर ईशा, तिचा पती भरत तख्तानी किंवा देओल कुटुंबातील कोणीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या युजरच्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, याबाबत सांगता येणार नाही.

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

सोशल मीडिया पोस्ट
सोशल मीडिया पोस्ट

ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी भरतशी लग्न केलं होतं. दोघांचे लग्न इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणाने झालं होतं. लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांना राध्या ही मुलगी झाली आणि २०१९ मध्ये ईशाने दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला होता. ईशा व भरत सोशल मीडियावर एकमेकांबरोबचे फोटो शेअर करत असतात. पण हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भरत दिसला नव्हता, तेव्हापासून ईशा व त्याच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini daughter esha deol bharat takhtani separation rumours after social media post gone viral hrc