अभिनेता शाहरुख खान बॉलीवूडचा सुपस्टार म्हणून ओळखला जातो. शाहरुखने ८० च्या दशकात टीव्ही मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. हेमा मालिनी यांच्या ‘दिल आशना है’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदापर्ण केले. पण पुढे जाऊन शाहरुख सुपस्टार बनेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. हेमा मालिनी यांच्या गुरु माँ यांनी शाहरुख खानबाबत एक भविष्यवाणी केली होती. आणि ती खरी ठरली. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- “पती धर्मेंद्र यांच्याबरोबर राहत नाही कारण…”, हेमा मालिनींचा मोठा खुलासा

१९९२ मध्ये शाहरुखचे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते. यापैकी एक ‘दिल आशना है’ होता. या चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका हेमा मालिनी होत्या. शाहरुखचा हा पहिलाच चित्रपट होता. एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी शाहरुखला चित्रपटासाठी साइन केले होते, तेव्हा त्यांच्या गुरु माँ यांनी शाहरुख सुपस्टार बनेल अशी भविष्यवाणी केली होती.

एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. हेमा म्हणाल्या, “मी शाहरुखला फौजी मालिकेत बघितले होते. त्यात तो खूपच गोड दिसत होता. त्याचकाळात माझ्या ‘दिल आशना है’ चित्रपटाचे लेखनही सुरु होते. या चित्रपटासाठी मला नवीन चेहऱ्याची गरज होती. जेव्हा मी शाहरुखला पाहिले तेव्हा हा चांगला दिसत आहे आणि याला आपण आपल्या चित्रपटात घ्यायला हवं.”

हेही वाचा-“अभिनेत्री बनू नकोस नाहीतर…”; बॉलीवूडची स्वप्न पाहणाऱ्या क्रिती सेनॉनला नातेवाईकांनीच दिलेला इशारा, म्हणालेले…

हेमा मालिनी म्हणाल्या, “मी ‘दिल आशना है’ चित्रपट बनवत होते. याची कल्पना मी गुरु माँ यांना दिली होती. त्याा म्हणाल्या होत्या तुला खूप मोठा हिरो मिळत आहे. पण मला ही गोष्ट त्यावेळेस लक्षात आली नव्हती. पण गुरु माँ यांना पुढे काय घडणार आहे हे कळतं. आणि तसचं झाली शाहरुख आता मोठा सुपस्टार बनला आहे.गुरु मां यांनी मला करिअरमध्येही खूप मदत केली होती. त्यांच्या सांगण्यावरुनच हेमा मालिनी यांनी बागवानवर सही केली होती. विवाहित असूनही त्यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini recalls how her guru ma predicted that shah rukh khan will be big superstar dpj