बॉलीवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री हेमा मालिनी यांचे आजही करोडो चाहते आहेत. हेमा मालिनी एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्याबरोबरच एक चांगल्या नृत्यांगना देखील आहेत. चित्रपट असो किंवा पर्सनल लाईफ हेमा मालिनी यांच्याबद्दलचे अनेक किस्से नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. हेमा मालिनी यांनाही कास्टिंग काऊचला सामोर जावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेमा मालिनी यांनी या मुलाखतीत संबंधित चित्रपट निर्मात्याचं नाव न घेता सांगितलं की, “मला एका निर्मात्यानं साडीच्या पदराला लावलेली पिन काढायला सांगितली होती. त्याला अशाप्रकारचा सीन शूट करायचा होता. पण मी त्यांना सांगितलं की, असं केलं तर माझा पदर खाली पडले. त्यावेळेस निर्मात्यानं सांगितलं की, आम्हाला हेच पाहिजे. हे ऐकून मी अस्वस्थ झाले होते.”

हेही वाचा – शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘जवान’ चित्रपटाचा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित, जाणून घ्या

हा अनुभव शेअर करत हेमा मालिनी आजच्या चित्रपट निर्मात्यांविषयीही बोलल्या. त्या म्हणाल्या की, “आजकालचे चित्रपट निर्माते त्यांच्या स्टार्सला चांगलं दाखवण्यासाठी जास्त त्रास घेत नाही. तसेच आजच्या काळात चित्रीकरण करणं खूप आव्हानात्मक झालं आहे. त्यामुळे मी पुन्हा चित्रपटात काम करेन असं वाटतं नाही.”

हेही वाचा – इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्याच्या घरचं जेवण सर्वात जास्त आवडतं?, महेश मांजरेकर म्हणाले…

दरम्यान काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांचा नातू करण देओलचं लग्न पार पडलं. या लग्नाला धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी व त्यांच्या दोन मुलींना आमंत्रित केलं नव्हतं. तसेच फोनही केला नव्हता. त्यामुळे धर्मेंद्र यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर माफी मागितली होती. धर्मेंद्र यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली होती. करण देओल हा अभिनेता सनी देओलचा मुलगा आहे. १८ जूनला रोजी करणचे लग्न द्रिशा आचार्यबरोबर झाले. यादरम्यानचे देओल कुटुंबियांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.