सनी देओलची मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये अजुनही क्रेझ आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. अशातच सनी देओलची सावत्र आई व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा चित्रपट पाहिला आहे. चित्रपट पाहिल्यावर त्यांनी प्रतिक्रियाही दिली.

Video: आदिल खान सहा महिन्यांनी तुरुंगातून बाहेर, राखी सावंतला दिला इशारा; म्हणाला, “माझ्याबरोबर जे घडलं…”

zaheer iqbal Shatrughan Sinha birthday video
Video: रेखा पडल्या शत्रुघ्न सिन्हांच्या पाया, तर झहीरने…; सोनाक्षी सिन्हाच्या दोन्ही भावांची लग्नानंतर ‘या’ सेलिब्रेशनलाही गैरहजेरी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Fans and netizens reaction on tejashri Pradhan exit from premachi goshta serial
“खूप वाईट वाटतंय..”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील तेजश्री प्रधानच्या एक्झिटवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तुझा निर्णय…”
Suresh Dhas
Suresh Dhas : “…तर बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
CM Devendra Fadnvais on Santosh deshmukh murder case Update
Devendra Fadnavis: ‘संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा गुजरातमध्ये आश्रय’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
Jitendra Awhad, Mumbra Marathi case, Mumbra ,
मुंब्रा मराठी प्रकरणावर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लहान मुलांच्या वादाला…”

सिनेमा पाहून आल्यावर पापाराझींशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या, “गदर २ पाहून आले आहे. खूप छान वाटलं. चित्रपट माझ्या अपेक्षेप्रमाणेच अतिशय मनोरंजक होता. ७० आणि ८० च्या दशकातील काळ दाखविण्यात आला आहे. अनिल शर्मा यांनी खूप सुंदर दिग्दर्शन केले आहे.”

“मी सिगारेट ओढत होतो अन्…”, सुबोध भावेने मंजिरीला रक्ताने लिहिलेलं पत्र; खुलासा करत म्हणाला…

हेमा मालिनी यांनी सावत्र लेक सनी देओलच्या अभिनयाचंही कौतुक केलं. “‘गदर २’ मध्ये सनीने खूप चांगलं काम केलंय. उत्कर्ष शर्मानेही खूप चांगला अभिनय केला आणि ती नवीन मुलगीही (सिमरत कौर) खूप चांगली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर देशाप्रती जी देशभक्ती असायला हवी, ती आहे. शेवटी मुस्लिमांशी बंधुभावाची गोष्टही दाखवली आहे. हा भारत आणि पाकिस्तानसाठी चांगला संदेश आहे”, असं हेमा मालिनी म्हणाल्या.

दरम्यान, हेमा मालिनी या धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आणि दोन मुली आहेत. हेमा मालिनी सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यापासून अंतर ठेवतात. दोन महिन्यांपूर्वी सनी देओलचा मुलगा करण देओलचं लग्न झालं, त्या लग्नात हेमा मालिनी व त्यांच्या मुली सहभागी झाल्या नव्हत्या. पण ‘गदर २’ प्रदर्शित झाल्यानंतर इशा देओलने स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं आणि त्याठिकाणी सनी देओल आणि बॉबी देओलने हजेरी लावली होती.

Story img Loader