सिनेसृष्टीतील दिग्गज जोडपं हेमा मालिनी व धर्मेंद्र यांनी मुलगी ईशा देओलचा घटस्फोट झाला आहे. ईशा व भरत तख्तानी ११ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले आहेत. घटस्फोटानंतर आता ईशा राजकारणात येणार का, याबाबत हेमा मालिनींना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं ते जाणून घेऊयात.
‘एबीपी न्यूज’ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, हेमा मालिनी यांनी खुलासा केला की त्यांचे पती धर्मेंद्र यांनी त्यांना राजकारणात येण्यास पाठिंबा दिला. “माझे कुटुंब नेहमीच माझ्यासोबत राहिले आहे. त्यांच्यामुळेच मी हे करू शकले आहे. ते माझ्या मुंबईतील घराची काळजी घेत आहेत, त्यामुळे मी अगदी सहज मथुरेत येत आहे. मी येते आणि परत जाते, मी जे काही करत आहे, त्यावर धरमजी खूप खूश आहेत, म्हणूनच ते मला पाठिंबा देतात आणि मथुरेतही येतात.”
‘महाभारत’ मधील ‘कृष्णा’चे IAS अधिकारी असलेल्या एक्स पत्नीवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार देत म्हणाले…
त्यांच्या मुली ईशा आणि अहाना देओल यांना राजकारणात येण्याची इच्छा आहे का, असं विचारलं असता हेमा मालिनी म्हणाल्या, “त्यांना हवं असल्यास त्या राजकारणात येऊ शकतात. ईशाला राजकारणात खूप रस आहे, तिला ते करायला आवडतं. येत्या काही वर्षांत जर तिला रस असेल तर ती नक्कीच राजकारणात येईल.”
अलीकडेच ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी लग्नाच्या ११ वर्षानंतर विभक्त झाल्याचं काही दिवसांपूर्वी जाहिर केलं. “आम्ही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनात होणारे बदल आणि आमच्या दोन मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या आनंदाचा व हिताचा आम्ही नेहमीच विचार करू. आमच्या प्रायव्हसीचा कृपया आदर करा,” असं त्यांनी निवेदनात म्हटलं होतं.