दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंती माला यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने काल, रात्री ७५व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली. यामध्ये वैजयंती माला यांचंही नाव सामील आहे. त्यानिमित्ताने अनेक कलाकार मंडळी वैजयंती माला यांना शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर वैजयंती माला यांच्यासंदर्भात खास पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एक्स’वर हेमा मालिनी यांनी वैजयंती माला आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हेमा मालिनी यांनी हे फोटो शेअर करत लिहिलं आहे, “माझ्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय दिवस आहे. काल माझी आदर्श व्यक्ती वैजयंती माला आणि त्यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या चेन्नईतील निवासस्थानी भेट झाली. त्यांचं संपूर्ण आयुष्य नृत्यमय आहे. त्या बोलतात नृत्यातून, त्या जगतात नृत्य आणि त्यांच्या भोवती एक चमक आणि वेगळा ऑरा आहे. या भेटीत इंडस्ट्रीतील त्यांचा अनुभव याविषयी जुन्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. माझ्यासाठी हा महान दिवस होता. मला या प्रेमळ महिलेकडून खूप सारं प्रेम मिळालं. आतून आणि बाहेरून ही महिला खूप सुंदर आहे.”

हेही वाचा – Video: शाळेची सफाई करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ शेअर करत जितेंद्र जोशीने प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला…

हेमा मालिनी यांच्या व्यतिरिक्त सायरा बानो यांनी वैजयंती माला यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘ई-टाइम्स’ या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाला, “मी खूप आनंदी आहे. मी त्यांचे चित्रपट पाहत मोठी झाली आहे आणि त्या माझ्यासाठी बहिणीप्रमाणे आहेत.”

हेही वाचा – अंदमानच्या प्रवासात मुग्धा वैशंपायनला पती प्रथमेश लघाटेची येतेय आठवण, पोस्ट शेअर करत म्हणाली, “हे मिसिंग प्रकरण…”

दरम्यान, वैजयंती माला यांच्या व्यतिरिक्त दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी याला पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय मिथुन चक्रवर्ती, दिवंगत दाक्षिणात्य अभिनेते विजयकांत, संगीतकार प्यारे लाला शर्मा, गायिका उषा उत्थुप यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hema malini visit vyjayanthimala and share photos on being honored with padma vibhushan 2024 pps
Show comments