‘हेरा फेरी’च्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली. तर या चित्रपटातून परेश रावल, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार हे त्रिकुट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नक्की काय पहायला मिळेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक होते. आता या चित्रपटाची कथा काय असेल हे समोर आलं आहे.
फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगचा श्री गणेशा करण्यात आला. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये या चित्रपटाची टीम व्यस्त आहे. या चित्रपटाबद्दल नवनवीन अपडेट्स मिळत आहेत. आता अशातच या चित्रपटात काय पहायला मिळेल हेही आऊट झालं आहे. ‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, ‘हेरा फेरी ३’ची कथा तिथून सुरू होईल जिथे ‘फिर हेरा फेरी’ची कथा संपली होती. यात संजय दत्तची भूमिकाही समोर आली आहे.
आणखी वाचा : “…तर चित्रपट पाहणार नाही”; ‘हेरा फेरी’च्या निर्मात्यांवर प्रेक्षक नाराज
चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने ‘पिंकविला’ला सांगितले की, ‘बंदूकांचे काय होते हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि ‘हेरा फेरी ३’ची सुरुवात ‘फिर हेरा फेरी’च्या शेवटच्या दृश्याने होईल. तिथून कथा एक झेप घेईल आणि तिन्ही पात्रांना बंदूक आणि माफियांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटपर्यंत घेऊन जाईल. तीन पात्र आणि बंदुका व्यतिरिक्त या कथेला ‘फिर हेरा फेरी’चा मोठा संबंध असेल.”
यासोबतच सूत्राने खुलासा केला की, संजय दत्त रवी किशनच्या दूरच्या भावाची भूमिका साकारत आहे. ‘फिर हेरा फेरी’ मधील राजू, श्याम आणि बाबूराव यांनी मूर्ख बनवलेल्या अनेक पात्रांपैकी एक म्हणजे रवी किशन. त्यांच्या ट्रॅकमध्ये संजय दत्त कॅमिओ करताना दिसेल. त्यामुळे आता ‘हेरा फेरी ३’बद्दल प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढलेली दिसत आहे.