बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. यावरुन त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे. २०२२ वर्ष अक्षयसाठी फारसं चांगलं नव्हतं. या वर्षामध्ये त्याचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘कटपुतली’ आणि ‘राम सेतू’ असे चित्रपट प्रदर्शित झाले. यातील ‘कटपुतली’ हा चित्रपट सोडल्यास बाकी सर्व चित्रपट देशभरातल्या चित्रपटगृहांमध्ये दाखल झाले होते. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते.

अक्षय कुमार सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तो तीन-चार दिवसांनंतर सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो “काही तरी नवीन करायला जातोय. खूप मेहनत केली आहे. खूप आधीपासून त्यावर काम सुरु आहे. तुमच्यासह शेअर करत आहे. सांगतो.. एक भन्नाट गोष्ट आहे”, असे म्हणाला आहे. त्याने या व्हिडीओला “काहीतरी नवीन करायची मजा निराळी असते. तुम्हाला लवकरच कळेल” असे कॅप्शन दिले आहे. व्हिडीओ आणि कॅप्शन या दोन्हींवरुन चाहत्यांनी नवनवे तर्क लावायला सुरुवात केली आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

आणखी वाचा – वादात असलेल्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमावले होते इतके कोटी, प्रेक्षकांचाही मिळाला प्रतिसाद

अक्षयने व्हिडीओ पोस्ट केल्यावर लगेच ट्विटरवर ‘#HeraPheri3’ हा ट्रेंड सुरु झाला. चाहत्यांनी या व्हिडीओवरुन ‘हेरा फेरी’ फ्रेन्चायझीमधला तिसरा भाग ‘हेरा फेरी ३’ लवकरच येणार असल्याची घोषणा अक्षय करणार असल्याचा तर्क लावला आहे. तर काहीजणांनी अक्षयकडे ‘आम्हाला हेरा फेरी ३ हवा आहे, तो लवकर घेऊन ये’, अशी मागणी केली आहे. यासंबंधित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अक्षय नेमकं काय म्हणणार आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “शाहरुख एवढे मोठे डायलॉग…” शोएब अख्तरचं किंग खानच्या पाकिस्तानी चाहत्याला धम्माल उत्तर

पिंकव्हिलाच्या एका वृत्तानुसार, मागील काही महिन्यांपासून अक्षय आणि निर्माते फिरोज नाडियाडलवाला ‘हेरी फेरी’, ‘आवारा पागल दीवाना’ आणि ‘वेलकम’ या तीन लोकप्रिय फ्रेन्चायझीमधील पुढील चित्रपटांबाबत चर्चा करत आहेत. या तिन्हीही चित्रपटांमुळे त्याचे चित्रपट फ्लॉप होण्याचे सत्र थांबेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader