Hera Pheri 3 Update : बॉलीवूडच्या विनोदी चित्रपटांमध्ये ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अतरंगी संवाद, अफलातून पटकथा आणि अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी यांच्यातील भन्नाट केमिस्ट्रीमुळे हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. आजही या चित्रपटांचे विनोदी प्रसंग आणि संवाद चाहत्यांना खळखळून हसवतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची, ‘हेरा फेरी ३’ ची अनेक वर्षांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यामध्ये पहिल्या दोन भागातील मूळ कलाकार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत. अनेक अफवांनंतर अखेर ‘हेरा फेरी ३’ बद्दल एक खात्रीलायक बातमी आल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पसरला आहे.
अक्षय कुमारने दिली अपडेट
‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय कुमारने ‘हेरा फेरी ३’ (Hera Pheri 3)बद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्याने सांगितले की, सध्या त्यांची टीम ‘वेलकम’ चित्रपटावर काम करत आहे. मात्र, निर्मात्यांचे सध्याचे चित्रपट झाल्यानंतर ‘हेरा फेरी ३’ची निर्मिती सुरू होईल. पुढील वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असेही त्याने नमूद केले.
‘हेरा फेरी’ हा चित्रपट प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar), सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि परेश रावल (Paresh Rawal) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. एका पैशांच्या अफरातफरीच्या योजनांमध्ये अडकलेल्या या तिघांची कथा खळखळून हसवणारी ठरली. चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यातील कलाकारांच्या कॉमेडीच्या उत्कृष्ट टायमिंगमुळे चित्रपट प्रेक्षकांना भावला. त्यानंतर आलेल्या ‘फिर हेरा फेरी’मध्ये श्रीमंत झालेल्या राजू , श्याम आणि बाबूराव या तीन पात्रांची संपत्ती पुन्हा फसवणुकीत कशी गेली, याची कथा दाखवण्यात आली होती.
चाहत्यांना मोठ्या अपेक्षा
‘हेरा फेरी ३’ हा सिनेमा पहिल्या दोन सिनेमांप्रमाणे विनोदाचा ठसा कायम ठेवत प्रेक्षकांचे मनोरंजन करतो का, याबद्दल त्यांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणावर मनोरंजनाची अपेक्षा आहे.