बॉलिवूडचा सुप्रसिद्ध निर्माता अन् दिग्दर्शक करण जोहर हा चांगलाच चर्चेत असतो. नुकतंच करणने तब्बल ८ वर्षांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधून दिग्दर्शक म्हणून जबरदस्त कमबॅक केलं. याबरोबरच करण हा त्याच्या लोकप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण’साठीही ओळखला जातो. नुकताच या चॅट शोचा आठवा सीझन सुरू झाला असून वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

बॉलिवूड गॉसिप आणि सेलिब्रिटीजची गुपित उलगडणारा शो जर तुम्हालाही आवडत असेल तर या शोवर बेतलेल्या नवीन क्विजमध्ये विचारलेल्या वेगवेगळ्या भन्नाट प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला नक्कीच आवडतील. ‘कॉफी विथ करण’मध्ये करण जोहर कोणाला बोलावू इच्छित नाही? किंवा या शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कपमधून नेमकी कॉफीच दिली जाते की आणखी काही? अशा काही भन्नाट प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत की नाही हे या क्विजच्या निमित्ताने तुमच्या ध्यानात येईल. खालील लिंकवर क्लिककरून तुम्ही या क्विजमध्ये सहभागी होऊ शकता.

तुम्ही करण जोहरच्या या शोचे चाहते असाल तर तुम्हाला हा खेळ खेळायला नक्कीच मजा येईल.