‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून बराच गदारोळ निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्षांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला असून त्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. हा चित्रपट ५ मे रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तामिळनाडू राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुधवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा- Video : प्रियांकाने निक जोनाससमोरच दुसऱ्या अभिनेत्याला केले किस; व्हिडिओ व्हायरल
हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ चित्रपटाविरोधात काही गटांनी निषेधाचे आवाहन केले आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्टही जारी करण्यात आली आहे. या पोस्टची गुप्तचर विभागाने गंभीर दखल घेतली आहे. “ काही जिल्ह्यांमध्ये इस्लामिक गटांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र सरकारने अद्याप ही मागणी मान्य केलेली नाही. तर सगळ्या सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये केरळमधून जवळपास ३२००० महिला बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आता निर्मात्यांनी त्यात बदल केला आहे. आज या चित्रपटाच्या नवीन टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक मोठा बदल केला गेला. आता त्या जागी असे लिहिण्यात आले आहे की ३ महिलांचा ब्रेनवॉश करून, त्यांचे धर्मांतर करून त्यांना भारत आणि परदेशातील दहशतवादी मोहिमांवर पाठवण्यात आले होते.
हेही वाचा- एक तोंडावर थुंकला, तर दुसऱ्याने धरला गळा; अनिल कपूर आणि सनी देओलमध्ये ‘त्या’ सीनवरुन झाला होता राडा
सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML)च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर अनेक जण या चित्रपटाला ‘प्रोपगंडा चित्रपट’ म्हणत आहेत. चित्रपटावर होणाऱ्या या टीकेमुळे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला ३२००० हा महिलांचा आकडा बदलण्यात आला आहे.