केवळ १८ दिवसांत सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाने ४६२ कोटींची कमाई केली आहे. वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहेत सनी देओलचा ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ला टक्कर देत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण तरी ‘गदर २’ इतर चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

लवकरच हा चित्रपट शाहरुख खानच्या ‘पठाण’चा रेकॉर्डही मोडीत काढणार असल्याची चर्चा आहे. परंतु आजवरचा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त फुटफॉल असलेले रेकॉर्ड हे दोन सुपरस्टार्सच्याच नावावरच आहे. ‘फुटफॉल’म्हणजे बॉक्स ऑफिसवर येऊन चित्रपटगृहात चित्रपट पाहणाऱ्या लोकांची संख्या. याबाबतीत सलमान खान आणि आमिर खान यांचाच बोलबाला आहे.

Mithun Chakraborty, Dadasaheb Phalke Award,
डिस्को डान्सर…
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Iran Israel Conflict
“बिन्यामिन नेतान्याहू २१ व्या शतकातील हिटलर”, इराणच्या भारतीय राजदूतांची टीका; भारताकडे मागितली मदत!
लेख: ही पूर्वनियोजित चकमक कोणाच्या सांगण्यावरून?
pedro almodovar loksatta latest marathi news
बुकबातमी: पेद्रो अल्मोदोव्हर कथा लिहितो….
abhijeet kelkar post on aarya slapped nikki tamboli
“…ते तुला नक्की एक संधी देतील”, निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने दिला ‘हा’ सल्ला
bhakti modi the 30 year old CEO reliance retails tira
अँटालियात झालेलं लग्न, आता रिलायन्समध्ये ‘या’ ब्रँडच्या आहेत सीईओ, ईशा अंबानीशी खास कनेक्शन असलेल्या भक्ती मोदी कोण आहेत?
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स

आणखी वाचा : प्रियांका चोप्राच्या बहिणीला जबरदस्ती कीस करणाऱ्या दिग्दर्शकाचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले “बंद दरवाज्यामागे…”

समीक्षक सुमित कडेल यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. सर्वात जास्त ‘फुटफॉल’ असणाऱ्या चित्रपटांबद्दल आपण जाणून घेऊया. पहिल्या क्रमांकावर ३.६९ कोटींचा फुटफॉल आमिर खानच्या ‘दंगल’ला मिळाला. त्याखालोखाल सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला ३.५४ कोटींचा फुटफॉल होता. आमिर खानच्या ‘पिके’ला ३.५० कोटींचा फुटफॉल लाभला. तर सलमानच्याच ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन्ही चित्रपटांसाठी ३.२० आणि ३.०८ असा अनुक्रमे फुटफॉल पाहायला मिळाला.

सनी देओलच्या ‘गदर २’ला ३.०५ कोटींचा फुटफॉल मिळाला आणि हाच आकडा ३.२० ते ३.४० कोटींच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आमिर खान आणि सलमान खान यांच्या या वर्चस्वाला सनी देओल लवकरच छेद देणार असल्याचं चित्र समोर उभं राहिलं आहे. ‘गदर २’ ला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला असून अजूनही बॉक्स ऑफिसवर याच चित्रपटाची चर्चा आहे.