अभिनेत्री हिना खान मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अलिकडेच हिनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर हिना खानचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी हिना खानचं ब्रेकअप झाल्याचा अंदाज बांधला होता. पण आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिना खानने ब्रेकअपच्या चर्चांवर मौन सोडत सत्य परिस्थिती सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिना खानने तिचं खासगी आयुष्य आणि बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालशी असलेलं नातं यावर भाष्य केलं. या मुलाखतीत हिनाने तिचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. ती म्हणाली, “मी विश्वासघात झाल्याची पोस्ट जशी शेअर केली तसं माझ्या सर्व मित्रांना धक्का बसला. सगळे मला मसेज करत होते, काय झालंय? असं विचारत होते. कारण या पोस्टमुळे माझं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या.”

आणखी वाचा-हिना खानने मॅनेजरच्या लग्नात केलेल्या ‘या’ कृतीमुळे नवरदेवाला थेट गमवावे लागले १ लाख रुपये

हिना पुढे म्हणाली, “मला करिश्मा तन्नाचाही फोन आला होता. सर्वकाही ठीक आहे ना? असं तिने मला विचारलं होतं. देवाच्या कृपेने माझं लव्ह लाइफ उत्तम चाललं आहे आणि ती पोस्ट माझी अपकमिंग वेब सीरिज ‘षड्यंत्र’बद्दल होती. पण त्यामुळे लोकांचा गैरसमज झाला.” हिनाच्या या आगामी वेब सीरिजमध्ये चंदन रॉय सान्याल आणि कुणाल रॉय कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

आणखी वाचा-…अन् संतापलेल्या हिना खानने मेकअप मॅनच्या कानशिलात लगावली; पाहा नेमकं काय घडलं

दरम्यान रॉकी आणि हिना यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त मैत्री होती. पण या मैत्रीचं नंतर प्रेमात रुपांतर झालं. ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांना या नात्याची जाहीर कबुली दिली होती. बिग बॉस ११ मध्ये हिना खानला रॉकीने सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांना हिना आणि रॉकी एकत्र दिसले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hina khan break silence on breakup rumours with boyfriend rocky jaiswal mrj