संगीत क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवणारे लोकप्रिय संगीतकार म्हणजे ए. आर. रेहमान. दिलीप कुमार नावानं जन्म झालेल्या ए. आर. रेहमान यांनी १९८० साली इस्लाम धर्म स्वीकारला. यावेळी त्यांना एका हिंदू ज्योतिषानं हे मुस्लीम नाव सुचवलं होत. हा नेमका किस्सा काय आहे? ते जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००० साली ‘बीबीसी’ वृत्तसंस्थेच्या टॉक शोमध्ये ए. आर. रेहमान यांनी हा किस्सा सांगितला होता. टॉक शोच्या सुरुवातीला रेहमान म्हणाले की , “जेव्हा माझे वडील कॅन्सरशी झुंज देत होते, तेव्हा एक सुफी वडिलांवर उपचार करत होते. त्या सुफीवर माझा अधिक विश्वास बसला होता. त्यानंतर मी आणि माझं कुटुंब ७-८ वर्षांनी त्याच सुफीला भेटलो. त्यावेळी आम्ही दुसरा धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. हा आध्यात्मिक मार्ग स्वीकारल्यामुळे आम्हाला शांती मिळाली.”

हेही वाचा – “मी कधीच बोल्ड सीन्स देत नाही कारण…”, ‘द फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

पुढे आपल्या आईविषयी सांगत ते म्हणाले की, “माझी आई हिंदू धर्माचं पालन करत असतं, त्यावेळी घरी नेहमी इतर धर्मांतील देवांचे फोटो असायचे. माझी आई खूप आध्यात्मिक होती. आम्ही हबीबुल्लाह रोड येथील घरात लहानाचे मोठे झालो. त्या घरातल्या भितींवर हिंदू देवी-देवतांचे फोटो लावले होते. यामध्ये येशूचाही फोटो होता. तसेच मक्का आणि मदीना या स्थळांचाही फोटो होता.”

ज्यावेळी धर्मांतर केलं त्यावेळी नातेसंबंधांवर परिणाम झाला का? यावर रेहमान म्हणाले की, “आमच्या आजूबाजूच्या असलेल्या लोकांना आमच्याविषयी काही घेणं-देणं नव्हतं. मी संगीतकार होतो आणि यामुळे आम्हाला अधिक सामाजिक स्वातंत्र्य मिळालं होतं.”

हेही वाचा – लग्नापूर्वी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा पोहोचले अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात; व्हिडीओ समोर

पुढे ए. आर. रेहमान यांनी नावाविषयी सांगितलं की, “अल्लाह रक्खा (ए.आर) हे नाव माझ्या आईनं निवडलं आहे. कारण हे आईच्या स्वप्नात आलं होतं. आणि रेहमान हे माझ्या कुटुंबातील इतर लोकांनी निवडलं होतं.”

हेही वाचा – केतकी चितळेच्या आयुष्यावर लवकरच प्रकाशित होणार पुस्तक, तुरुंगात जाण्याचा प्रवास उलगडणार

“संपूर्ण कुटुंब इस्लाम धर्मांतर करण्यापूर्वी माझ्या छोट्या बहिणीचं लग्न करू इच्छित होतं. त्यामुळे माझ्या छोट्या बहिणीची कुंडली घेऊन एका हिंदू ज्योतिषीकडे गेलो होतो. त्यावेळेस हिंदू ज्योतिषीनं मला मुस्लीम नावं सुचवलं होतं. अब्दुल रेहमान किंवा अब्दुम रहीम असं नाव सुचवलं होतं. तेव्हा मला रेहमान नाव लगेचं आवडलं,” असं संगीतकार यांनी ‘बीबीसी’च्या टॉक शोमध्ये सांगितलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu astrologer suggested muslim name to a r rahman pps
Show comments