अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही आपले एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दीपिकाने २०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ जेंडर केज’ चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये दीपिकाने प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विन डिझेलबरोबर काम केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Video : “माझ्या सगळ्या गाड्यांचे नंबर…” श्रद्धा कपूरने पापाराझींबरोबर साधला मराठीत संवाद, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘ट्रिपल एक्स’ चित्रपट रिलीज झाल्यावर आता ६ वर्षांनी विन डिझेलने त्याची सहकलाकार दीपिका पदुकोणसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये विन डिझेल लिहितो की, “दीपिका पदुकोणबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. ती मला भारतात घेऊन आली होती मी नक्की पुन्हा एकदा तिकडे येईल…खूप प्रेम!” २०१७ मध्ये विन ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ जेंडर केज’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आला होता.

हेही वाचा : दीपिका पदुकोणने पतीला केले ट्रोल; इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहसाठी शेअर केला भन्नाट मीम

विन डिझेलने पोस्ट शेअर करीत यामध्ये दीपिकाला टॅग केले आहे. दीपिकाने ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हार्ट इमोजी लावत रिशेअर केली आहे. ‘ट्रिपल एक्स’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर एक वर्षांनी अभिनेत्रीचे नाव २०१८ च्या ‘टाइम’ मासिकात सर्वात प्रतिभावान व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाले होते. यावेळी सुद्धा विनने दीपिकाचे पोस्ट शेअर करीत अभिनंदन केले होते. विन डिझेलची पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी रणवीर सिंह सावधानतेचा इशारा दिला आहे. एका युजरने कमेंट करत, “विन डिझेलने फोटो टाकलाय…रणवीर भाई जरा जपून”, तर दुसऱ्या एका युजरने “ही पोस्ट रणवीर-दीपिकाच्या ब्रेकअपला कारण ठरू शकते” अशी मजेशीर कमेंट केली आहे.

दरम्यान, विन डिझेलच्या ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ या सीरिजचा दहावा भाग म्हणजेच ‘फास्ट एक्स’ (Fast X) हा चित्रपट १९ मे २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला भारतात भरभरून प्रतिसाद मिळत असून २०२३ मध्ये १०० कोटींच्या यादीत समावेश करणारा हा भारतातील पहिला हॉलीवूड चित्रपट ठरला आहे.